AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kranti Redkar On Sameer Wankhede: कसं आहे क्रांती रेडकर आणि समीन वानखेडे यांचं नातं? जुळ्या लेकींबद्दल अभिनेत्री म्हणाली…

Kranti Redkar On Sameer Wankhede: 'असा नवरा मिळायला नशीब लागतं, ते स्ट्रिक्ट आहे पण..., क्रांती रेडकर हिने सांगितलं वैवाहिक आयुष्यातील खास सिक्रेट, जुळ्या लेकींबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

Kranti Redkar On Sameer Wankhede: कसं आहे क्रांती रेडकर आणि समीन वानखेडे यांचं नातं? जुळ्या लेकींबद्दल अभिनेत्री म्हणाली...
Kranti Redkar And Sameer Wankhede
| Updated on: Aug 13, 2026 | 9:20 AM
Share

Kranti Redkar On Sameer Wankhede : मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लेकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकर आता तिच्या सिनेमांमुळे कमी पण सोशल मीडिया व्हिडीओमुळे अधिक चर्चेत असते. अभिनेत्री कायम मुली छबिल आणि गोदो यांच्याबद्दल बोलत असते आणि त्यांचे किस्से सांगत असते. दरम्यान, ‘फिल्मफेअर मराठी अवॉर्डस’ सोहळ्यात क्रांती हिने लेकींबद्दल आणि पती समीर वानखेडे यांच्याबद्दल सांगितलं आहे. समीर यांच्यासोबत असलेल्या बॉण्डिंगबद्दल देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘असा नवरा मिळायला नशीब लागतं, ते असे की मला कसलीच धास्ती वाटत नाही. ते छबिल आणि गोदो यांची देखील काळजी घेतात, त्यांना भरवण्यापासून त्यांना झोपवण्यापर्यंत ते सगळं करतात. ते खूप मदत करतात. ते असले की मला कसलीही भीती नसते… माझ्या मुलांची ते व्यवस्थित काळजी घेतात..’, असं देखील क्रांती म्हणाली.

समीर वानखेडे यांच्यासोबत असलेली क्रांतीची बॉण्डिंग

क्रांती म्हणाली, ‘आमचं बॉण्डिंग फिरण्यातूनच होतं. नवीन जागा बघायची… आम्हा दोघांना ऐतिहासिक वास्तूंची प्रचंड आवड आहे. आम्ही इतिहास वाचतो. अनेक ठिकाणचं जेवण आम्हाला ट्राय करायला आवडतं. याच्यातच आमचं प्रेम आहे. समीर यांना आंतरराष्ट्रीय जेवण ट्राय करायला फार आवडतं. अनेकांच्या घशाखाली ड्राय जेवण उतरत नाही, पण समीर बेहल चीजसोबत खातात…

मला बिर्याणी, मालवणी फिश करी प्रचंड आवडते… त्यावर मला ते कायम म्हणतात, इतके मसाले कशी खातेस… याबाबतीत आम्ही वेगळे आहोत.समीर यांचा स्वभाव रिझर्व आहे. ते फार बोलत नाहीत. अतिशय स्ट्रीक्ट आहेत. आमच्या दोघांचे स्वभाव फार वेगळे आहेत. याच कारणामुळे आमचं चांगलं जमतं… दोघेही बडबड करत असतो. तेव्हा खूप मज्जा येते.’, असं देखील अभिनेत्री म्हणाली.

मुलींबद्दल क्रांती काय म्हणाली?

मुलींना झोपवताना क्रांती स्वामींची पोथी वाचते. व्हिडीओबद्दल देखील अभिनेत्री म्हणाली, ‘इन्स्टावर जो फॅनबेस तयार झाला आहे, तो मला आता परका वाटत नाही. मैत्रिणीला किंवा बहिणीला घडलेला किस्सा कसा सांगते, त्याचप्रकारे मी व्हिडीओमध्ये देखील सांगते. आता तर कमेंट करण्यांची नावं देखील मला पाठ झाली आहे. एखाद्याने कमेंट केली नाही तर, अरे याव्यक्तीने कमेंट केली नाही… असं होतं मला… एवढंच नाही तर, जर कोणी ट्रोल करत कमेंट केली तर, दहा – बारा जण एकदाच थावत येतात. हे प्रेम निस्वार्थी आहे. त्यामुळे या सगळ्यांचे मी आभार मानतो…’ असं देखील क्रांती म्हणाली.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता