लोकसभा निवडणुकीदरम्यान ट्विटरवर विक्रमी ट्विट

| Updated on: May 26, 2019 | 11:27 AM

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेर संपली. नुकतंच लोकसभा निवडणुकीचा निकालाही जाहीर झाला. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी सोशल मीडियाचा वापर करत जोरदार प्रचारबाजी केली. ‘ट्विटर’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निवडणुकीदरम्यान तब्बल 39 कोटी 6 लाख ट्विट करण्यात आले आहेत. ट्विटर इंडियाने गुरुवारी (23 एप्रिल) याबाबतची माहिती दिली आहे. या माहितीनुसार 2014 च्या तुलनेत ट्विटची […]

लोकसभा निवडणुकीदरम्यान ट्विटरवर विक्रमी ट्विट
Follow us on

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेर संपली. नुकतंच लोकसभा निवडणुकीचा निकालाही जाहीर झाला. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी सोशल मीडियाचा वापर करत जोरदार प्रचारबाजी केली. ‘ट्विटर’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निवडणुकीदरम्यान तब्बल 39 कोटी 6 लाख ट्विट करण्यात आले आहेत. ट्विटर इंडियाने गुरुवारी (23 एप्रिल) याबाबतची माहिती दिली आहे. या माहितीनुसार 2014 च्या तुलनेत ट्विटची संख्या तब्बल 300 टक्क्यांनी वाढली आहे.

ट्विटर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी ते 23 मे पर्यंत ट्विटरवर जवळपास 39 कोटी 6 लाख ट्विट करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान म्हणजेच 11 एप्रिल ते 19 मे पर्यंत यातील सर्वाधिक ट्विट करण्यात आले. यातील अनेक ट्विट हे धर्म, नोकरी, बेरोजगारी, शेती आणि नोटांबदीबाबत होते. विशेष म्हणजे यातील बहुतांश ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख होता. तसेच लोकसभा निवडणूक 2019 मध्ये बीजेपी फॉर इंडिया या ट्विटर अकाऊंटचा 53 टक्के उल्लेख नेटकऱ्यांनी केला आहे.

त्या तुलनेत काँग्रेसच्या INC काँग्रेस या ट्विटर हँडलचा केवळ 37 टक्केच वापर नेटकऱ्यांनी केला आहे. दरम्यान 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ट्विटरचा फार कमी वापर करण्यात आला होता. मात्र यंदा ट्विटरवर ट्विटची संख्या तब्बल 300 टक्क्यांनी वाढली आहे.

विशेष म्हणजे ट्विटरवर ट्विट करण्यासाठी हिंदी आणि इंग्रजी या भाषांचा प्रामुख्याने वापर करण्यात आला आहे. त्यानंतर गुजराती आणि तामिळ भाषेचा सर्वाधिक वापर ट्विट करण्यासाठी केला गेला आहे.

राजकीय पक्षांनी फेब्रुवारी महिन्यांपासून ते मे महिन्यापर्यंत सोशल मीडियावरील जाहिरातबाजीसाठी जवळपास 53 कोटी रुपये खर्च केले आहेत असा अहवाल फेसबुक अँड लायब्ररी यांनी दिला होता.

संबंधित बातम्या :

एकट्या भाजपकडून सोशल मीडियावरील जाहिरातींवर 25 कोटींचा खर्च, इतर पक्षांकडून किती?