राजकीय दबाव टाकल्याचे पुरावे द्या, अन्यथा राजकारण सोडा, उदय सामंतांचं राजन तेलींना आव्हान

| Updated on: Feb 15, 2021 | 5:32 PM

माजी आमदार राजन तेली यांनी केलेल्या आरोपाचा उदय सामंत यांनी समाचार घेतला. Uday Samant comment on Shivsena and Rane Supports Conflict

राजकीय दबाव टाकल्याचे पुरावे द्या, अन्यथा राजकारण सोडा, उदय सामंतांचं राजन तेलींना आव्हान
उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
Follow us on

रत्नागिरी: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उय सामंत यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील शिवसेना आणि राणे समर्थकांवरील वादावर प्रतिक्रिया दिली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये गेले काही दिवस राणे-विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळाला. पण, या प्रकरणात उदय सामंत यांनी शिवसेनेच्या नेत्यांना ही कानपिचक्या दिल्या आहेत. राजकीय जीवनात काम करत असताना आपल्यामुळे काही गोष्टी वादाच्या निर्माण होणार नाहीत, याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे, अशा शेलक्या शब्दात सामंत यांनी शिवसेनेच्या नेत्यांना सुनावलंय. तर संबंधित भाजप नेत्यांनाही टोला लगावला आहे. माजी आमदार राजन तेली यांनी केलेल्या आरोपाचा उदय सामंत यांनी समाचार घेतला. राजन तेलींनी पुरावे द्यावेत अन्यथा राजकार सोडावं असं आव्हान उदय सामंतांनी दिलं. (Uday Samant comment on Shivsena and Rane Supports Conflict )

रत्नागिरी सिंधुदुर्ग शांत राहावेत

रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे शांत राहिले पाहिजेत, ही शासनातील मंत्री म्हणून माझी भूमिका आहे. आमच्या कार्यकर्त्यांची जी काही समजूत काढायची आहे ती मी काढेन, त्यांना समजावण्याचा मी मंत्री म्हणून प्रयत्न करेन, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. त्यासबोत समोरच्यांनी देखील मोठेपणा दाखवला पाहिजे, असा टोला ही सामंत यांनी भाजपला म्हणजेच राणे समर्थकांना लगावलाय.

राजन तेलींच्या आरोपांचं खंडण

शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल झालाय. गुन्हा दाखल करण्यासाठी राजकीय दबाव टाकला जातोय. माजी आमदार राजन तेली यांनी केलेल्या आरोपाचे खंडन उदय सामंत यांनी केलंय. या प्रकरणातले पुरावे राजन तेली यांनी द्यावेत ते दिल्यास आपण राजकारण सोडू, अन्यथा तुम्ही सोडा असा थेट आव्हान उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेय.

अमित शाहांच्या वक्तव्यावरुन भाजपला कोपरखळ्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या देखते है याचा परिणाम काय झाला, त्यांना कळलं असेल, असा टोला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भाजपला लगावला आहे. देखते है म्हटल्यावर काय परिस्थिती होऊ शकते यावरून त्यांनी बोध घ्यावा, अशी खोपरखळी उदय सामंत यांनी भाजपचं नाव न घेता लगावलीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बंद खोलीतील चर्चेसंदर्भात अमित शहा यांनी देखते है, असं म्हटलं असणार ते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना हो, असं वाटलं असणार असा खुलासा केला होता.

संबंधित बातम्या:

‘देखते है’ म्हटलं की काय होतं याचा बोध घ्या, उदय सामंतांची भाजपला कोपरखळी

अमित शाहांच्या ‘देखते हैं’चा अर्थ उद्धव ठाकरेंनी ‘हो’ असा घेतला!, ‘त्या’ बंद दाराआडच्या चर्चेचा चंद्रकांतदादांकडून उलगडा?

(Uday Samant comment on Shivsena and Rane Supports Conflict )