उदयनराजेंचा पराभव, जितेंद्र आव्हाडांचा राजेंवर पुन्हा हल्ला!

| Updated on: Oct 25, 2019 | 1:24 PM

उदयनराजेंचा तब्बल 87 हजार 717 मतांनी पराभव झाला. या पराभवानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही उदयनराजेंवर टीकास्त्र सोडलं.

उदयनराजेंचा पराभव, जितेंद्र आव्हाडांचा राजेंवर पुन्हा हल्ला!
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निकालाकडे जसं राज्याचं लक्ष होतं, तसंच लक्ष सातारा लोकसभा पोटनिवडणुकीडेही होतं. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रीनिवास पाटील (Udayanraje Bhonsle vs Shriniwas Patil) यांच्यात लढत झाली. उदयनराजे भोसले यांना 5 लाख 48 हजार 903 इतकी मतं मिळाली तर श्रीनिवास पाटील (Udayanraje Bhonsle vs Shriniwas Patil) यांना 6 लाख 36 हजार 620 मतांसह बाजी मारली. उदयनराजेंचा तब्बल 87 हजार 717 मतांनी पराभव झाला. या पराभवानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही उदयनराजेंवर टीकास्त्र सोडलं.

“यंदाच्या लांबलेल्या पावसाळ्याने महाराष्ट्रात 27 बळी घेतले. साताऱ्यातील पावसाने एक राजकीय बळी घेतला, त्याचं नाव उदयनराजे भोसले” अशी टीका जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली. आव्हाडांनी ट्विट करुन आपली भूमिका मांडली.

यापूर्वीही उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावेळीही आव्हाडांनी ट्विट करुन जोरदार हल्ला चढवला होता. “उदयनराजेंच्या आचरट बालिश चाळ्यांना पाठिशी घालून जवळच्या माणसांना दुखावलं, काय मिळालं? असा उद्विग्न  सवाल जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना विचारला होता. उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश करताच, जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करुन टीकास्त्र सोडलं होतं.

उदयनराजेंचंही ट्विट

दरम्यान, उदयनराजे भोसले यांनीही आज ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या.

“आज हरलो आहे पण थांबलो नाही, जिंकलो नाही पण संपलो ही नाही, असे उदयनराजेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील लाखो जनतेचे आणि दिवस रात्र एक करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार. सदैव आपल्या सेवेशी तत्पर असे उदयनराजेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

संबंधित बातम्या 

लोकसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर उदयनराजेंचं भावनिक ट्विट