साताऱ्यात दोन ‘राजें’चं मनोमीलन, भाजपप्रवेशानंतर उदयनराजेंची शिवेंद्रराजेंशी चर्चा

| Updated on: Sep 15, 2019 | 3:30 PM

उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांची साताऱ्यात भेट घेऊन चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये मनोमीलन झाल्याची चर्चा यावेळी पाहायला मिळाली.

साताऱ्यात दोन राजेंचं मनोमीलन, भाजपप्रवेशानंतर उदयनराजेंची शिवेंद्रराजेंशी चर्चा
संग्रहित फोटो
Follow us on

पुणे : भाजपप्रवेश केल्यानंतर साताऱ्याचे माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांची साताऱ्यात (Udayanraje meets Shivendra Raje) रात्री बैठक झाली. भाजपप्रवेशानंतर पहिल्यांदाच दोघा राजांचं मनोमीलन झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर दोघा नेत्यांची भेट (Udayanraje meets Shivendra Raje) झाली.

महाराजांचा (उदयनराजे) निरोप आल्यानंतर भेटायला गेलो होतो, अशी प्रतिक्रिया शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. दोघांमध्ये औपचारिक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षवाढीसाठी याबाबत निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरणात बदल होत असल्याचं शिवेंद्रराजेंनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी अर्ध्या तासात माझ्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. 370 सारखं कलम रद्द करून त्यांनी अखंड राखण्याचा प्रयत्न केल्याचं सांगत शिवेंद्रसिंहराजे यांनी स्तुतिसुमनं उधळली. मी लोकसभेसाठी इच्छुक नसून मला राज्यात काम करायचं आहे, असं शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केलं.

कार्यकर्त्यांच्या शब्दाखातर काही गोष्टी कराव्या लागतात. कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यावर त्या क्षणी काही गोष्टी घडतात, मात्र मी कोणाचं सांगून काहीतरी करत नाही. मी दुसरं कोणाच्या सांगण्यावरून काही करत नाही. आम्ही दोघेही योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास सक्षम (Udayanraje meets Shivendra Raje) असल्याचं शिवेंद्रराजे यांनी म्हटलं आहे.

उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील मात्र जनतेचा आणि माझा मी केलेल्या कामावर विश्वास आहे. त्यामुळे मतदार पुन्हा एकदा संधी देतील, असा विश्वासही शिवेंद्रराजेंनी बोलून दाखवला.

उदयनराजे थोरले बंधू, विधानसभेला मला मदत करणार : शिवेंद्रराजे

लोकसभा निवडणुकीला मी उदयनराजे यांच्यासोबत होतो. त्यांच्याशी नातं असल्यामुळे कोणत्याही पक्षात असलो तरी ते मला मदत करणार, असा विश्वास शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजेंच्या भाजपप्रवेशापूर्वी बोलून दाखवला होता.