AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे आणि ओवैसी एकत्र येणार? शिवसेना UBT व AIMIM च्या युतीबाबत महत्वाची अपडेट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि असदुद्दीन ओवैसी हे पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. एआयएमआयएमच्या आमदाराने याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

उद्धव ठाकरे आणि ओवैसी एकत्र येणार? शिवसेना UBT व  AIMIM च्या युतीबाबत महत्वाची अपडेट
| Updated on: Jun 04, 2025 | 6:17 PM
Share

राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी याची तयारी सुरु केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणात अशा घटना घडल्या आहेत, ज्यामुळे कोणताही पक्ष कोणासोबतही युती करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच आता उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएम यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एआयएमआयएमच्या महाराष्ट्र युनिटने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत. काही काळापूर्वी आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या भल्यासाठी सर्व गैर-महायुती पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता एआयएमआयएमने युतीबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.

एआयएमआयएमने दिले युतीचे संकेत

एआयएमआयएमचे मालेगावचे आमदार मुफ्ती इस्माइल कासमी यांनी म्हटले की. ‘ठाकरे आणि ओवैसी एकत्र यावेत अशी आमची इच्छा आहे. धर्म हा आमच्यासाठी मुद्दा नाही, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलू शकतो. जर कोणी आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर बोलावले तर आम्ही स्वतः पुढे जाऊ. मात्र युती संदर्भात अंतिम निर्णय एआयएमआयएम प्रमुख ओवैसी घेतील.

आम्ही यापूर्वीही युतीचा प्रयत्न केला होता – मुफ्ती इस्माइल कासमी

एआयएमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माइल कासमी यांनी पुढे बोलताना महत्वाची माहिती दिली आहे. मुफ्ती इस्माइल कासमी म्हणाले की, ‘आम्ही गेल्या विधानसभा निवडणुकीतही युती करण्याचा प्रयत्न केला होता. आम्हाला महाविकास आघाडीत सामील व्हायचे यायचे होते पण आम्हाला घेण्यात आले नाही. आता आदित्य ठाकरेंनी आवाहन केले आहे, मात्र ते आम्हाला सोबत घेणार की नाही हे आगामी काळ ठरवणार आहे.’

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?