शिवसेना प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर, संजय राऊतांसह ‘त्या’ खासदाराला मुख्य प्रवक्तेपद, 16 जण कोण?

| Updated on: Mar 31, 2021 | 8:30 AM

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर, शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, आनंद दुबे यासारख्या नव्या नेत्यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी वर्णी लावल्याचं चित्र आहे. ( official spokesperson of Shivsena)

शिवसेना प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर, संजय राऊतांसह त्या खासदाराला मुख्य प्रवक्तेपद, 16 जण कोण?
uddhav thackeray
Follow us on

मुंबई : शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने, तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सूचनेने नवी यादी जाहीर झाली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या खासदार सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी पदोन्नती झाल्याचं दिसत आहे. (Uddhav Thackeray announces list of new official spokesperson of Shivsena)

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर, शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, आनंद दुबे यासारख्या नव्या नेत्यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी वर्णी लावल्याचं चित्र आहे. याशिवाय अ‍ॅड. अनिल परब, सुनील प्रभू, किशोरी पेडणेकर यासारख्या प्रवक्त्यांना पुनर्नियुक्त करण्यात आले आहे. तर नाराज नेते भास्कर जाधव यांनाही प्रवक्तेपद देण्यात आले आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुका लक्षात घेत विधानपरिषद आमदार अंबादास दानवे यांनाही प्रवक्तेपदाची धुरा मिळाली आहे.

हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना नव्या यादीत स्थान मिळालेले नाही.

शिवसेना प्रवक्तेपदी कोण कोण?

संजय राऊत – राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते
अरविंद सावंत – खासदार (मुंबई) – मुख्य प्रवक्ते
प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार
अ‍ॅड. अनिल परब – परिवहन मंत्री
सचिन अहिर – शिवसेना उपनेते (नवीन वर्णी)
सुनील प्रभू – आमदार (मुंबई)
प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे)
भास्कर जाधव – आमदार (रत्नागिरी) (नवीन वर्णी)
अंबादास दानवे – विधानपरिषद आमदार (औरंगाबाद-जालना) (नवीन वर्णी)
मनिषा कायंदे – विधानपरिषद आमदार (नवीन वर्णी)
किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई)
शीतल म्हात्रे – नगरसेविका (मुंबई) (नवीन वर्णी)
डॉ. शुभा राऊळ – माजी महापौर (मुंबई) (नवीन वर्णी)
किशोर कान्हेरे (नागपूर) (नवीन वर्णी)
संजना घाडी (नवीन वर्णी)
आनंद दुबे (मुंबई) (नवीन वर्णी)
( official spokesperson of Shivsena)

नव्या यादीत कोणाला स्थान नाही?

धैर्यशील माने – खासदार (कोल्हापूर)
डॉ. नीलम गोऱ्हे – विधानपरिषद आमदार
गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा मंत्री
उदय सामंत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

संबंधित बातम्या :

शिवसेना प्रवक्त्यांची यादी जाहीर, संजय राऊत मुख्य प्रवक्ते, ‘या’ दहा जणांना स्थान

(Uddhav Thackeray announces list of new official spokesperson of Shivsena)