Uddhav Thackeray :’शिवसेना काय तुम्हाला ….?’ शिवसेना सोडणाऱ्यांवर उद्धव ठाकरे यांनी अशा शब्दात फटकारलंय

| Updated on: Aug 29, 2022 | 6:37 PM

मला बाकीच्या तांत्रिक गोष्टी अजिबात माहिती नाहीत, परंतु दसऱ्याला शिवसेना मेळावा उत्साहात साजरा होणार आहे एव्हढं मात्र नक्की असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

Uddhav Thackeray :शिवसेना काय तुम्हाला ....? शिवसेना सोडणाऱ्यांवर उद्धव ठाकरे यांनी अशा शब्दात फटकारलंय
शिवाजी पार्कवरील शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडित होणार?; दसऱ्या मेळाव्यात खोडा येण्याचं नेमकं कारण काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : आज मुख्यमंत्र्यांच्या (CM House) निवासस्थानी बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील काही आमदार यावेळी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दसरा मेळावा घ्यायचा की नाही याबाबत बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. रात्री 9 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) यावेळी नेमका कोणाचा मेळावा होणार याबाबत कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे. त्याचबरोबर, शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा (Dussehra 2022) होणार असल्याचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केले आहे. उचलून खिशात टाकायला शिवसेना रस्त्यात पडलेली नाही असा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टोला लगावला आहे. शिवसेना गद्दाराच्या नाहीतर शिवसैनिकांच्या मेहनतीवर मोठी झाली आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसऱ्याला शिवतीर्थावर येण्याची तयारी सुरु

दसरा मेळावा शिवसेनेचा म्हणजे आमचाचं होणार आहे. आमच्या मनात संभ्रम वगैरे काही सुध्दा नाही. संभ्रम निर्माण करणाऱ्यांनी करु द्या. शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसऱ्याला शिवतीर्थावर येण्याची तयारी सुरु केली आहे. मला बाकीच्या तांत्रिक गोष्टी अजिबात माहिती नाहीत, परंतु दसऱ्याला शिवसेना मेळावा उत्साहात साजरा होणार आहे एव्हढं मात्र नक्की असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे दोन्ही गटात मोठा पेच निर्माण झाला आहे. तसेच यावर्षी कोरोनाचं बंधन नसल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये उत्साहात साजरा केला जातो

प्रत्येकवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये उत्साहात साजरा केला जातो. तिथं राज्यातून शिवसेनेचे कार्यकर्ते येतात. एकनाथ शिंदे यांनी आपली वेगळी भूमिका जाहीर केल्यापासून शिवसेनेत फुट पडली आहे. तसेच दोन्ही गट शिवसेना आमची असल्याची वक्तव्ये करीत आहे. दोन्ही गट कोर्टात गेल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कमध्ये कोणाचा दसरा मेळावा हे सुध्दा पाहावं लागणार आहे.