Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अमित शाह यांना अफझल खान म्हणाले? भाजपवर ठाकरेंची घणाघाती टीका!

| Updated on: Sep 27, 2022 | 2:28 PM

दिल्लीत महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु करताना मुंबईतील मातोश्रीमधून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अमित शाह यांना अफझल खान म्हणाले? भाजपवर ठाकरेंची घणाघाती टीका!
पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

दिनेश दुखंडे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे. मला आई भवनीवर विश्वास आहे, विजय आपलाच होईल, असं त्यांनी शिवसैनिकांना (Shivsena Politics) उद्देशून म्हटलंय. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून ठाकरेंनी महत्त्वाचं विधान केलं. यावेळी अफझल खान यांचं नाव घेऊन उद्धव ठाकरे यांनी भाजपत टीकेची तोफ डागली. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची एकीकडे सुनावणी सुरु असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना जोरदार टोला हाणला.

‘आई भवानीचा आशीर्वाद असल्यानंतर कितीही अफझल खान आले, तरी मला पर्वा नाही’, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. दसऱ्याला आपण भेटणारच आहोत. एक चांगली सुरुवात झालीय. न्याय आपल्याला मिळणार आणि मिळालाच पाहिजे. न्यायदेवतेवर आणि आई भवनाची माझा विश्वास आहे. दुर्गा भवानीच्या दर्शनाला मी येणार आहे, असंही त्यांनी म्हटलंय. यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. उस्मानाबादमधील अनेक शिवसैनिक मातोश्रीवर दाखल झाले होते. यावेळी शिवसेनेत प्रवेश केलेल्यांना उद्देशून उद्धव ठाकरे यावेळी बोलत होते.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

जालन्यात परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. ज्यांना खस्ता खाऊन तुम्ही मोठे केले, ते खोक्यात गेले, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. अर्जुन खोतकर यांचं नाव न घेता त्यांनी ठाकरेंनी खोतकरांवर टीका केली. इतकंच काय तर ईडी कारवायांवरुनही उद्धव ठाकरेंनी टोला लगावला.

आपलं कुठेही काहीही वाकडं झालेलं नाही. भवनाची मातेची आपल्यावर कृपा आहे. खरे कोण आणि खोटे कोण, ते आपल्याला भवानी मातेनं दाखवून दिलंय. दरम्यान, भाजपच्या कोणत्याही नेत्याचं नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख यांना यावेळी तिखट शब्दांत टीका केली. न्यायालयीन लढाई आपण जिंकू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.