
मुंबई : शिवसेनेमधील (Shivsena) बंडखोरीनंतर आता शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाल्याचे दिसते आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट असे चित्र सध्या निर्माण झालंय. एकनाथ शिंदे गट संख्याबळ पूर्ण करून सरकार स्थापनेच्या तयारीत लागलंय. मात्र, याचदरम्यान आता राज्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी खासदार आणि आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यास सुरूवात केलीयं. उल्हासनगरमध्ये एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (Srikant Eknath Shinde) यांच्या जनसंपर्क कार्यालयाला टार्गेट करत मोठी तोडफोड करण्यात आलीयं.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले दिसते आहे. आज सकाळी पुण्यात तानाजी सावंत यांच्याही कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर आता इकडे उल्हासनगरमध्ये श्रीकांत शिंदेंच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलीये. यावेळी शिवसैनिकांनी दगडफेक देखील केलीयं. उल्हासनगरच्या गोलमैदान परिसरात आहे हे कार्यालय आहे. शिवसैनिकांनी हे कार्यालय फोडले. आता पोलिसांनी शिवसैनिकांची धडपकड सुरू केली असून काही शिवसैनिकांना ताब्यात घेतल्याचे देखील कळते आहे.
तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील बालाजी नगर परिसरातील सावंत यांचे कार्यालय फोडले. तानाजी सावंत हे मूळ शिवसैनिक नाहीत असे म्हणत त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. याचपार्श्वभूमीवर मुंबईमध्ये 144 लागू करत जमावबंदीचे आदेश लावण्यात आले आहेत. परभणी येथे देखील एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी देण्यात आलीयं.