उर्मिला मातोंडकर यांच्या पंकजा मुंडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पंकजा म्हणतात, चला…

"भाजपच्या राष्ट्रीय सचिव, लोकप्रिय नेत्या पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!" असे ट्वीट अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी केले होते

उर्मिला मातोंडकर यांच्या पंकजा मुंडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पंकजा म्हणतात, चला...
पंकजा मुंडे, उर्मिला मातोंडकर
| Edited By: | Updated on: Jul 26, 2021 | 3:31 PM

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा आज वाढदिवस. त्या 42 वर्षांच्या झाल्या. 26 जुलै 1979 हा त्यांचा जन्मदिवस. सोशल मीडियावर त्यांना खास पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यकर्ते, चाहत्यांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त फक्त भाजपच नव्हे, तर इतर पक्षातील नेत्यांकडूनही शुभेच्छा दिल्या जात आहेत. प्रख्यात अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनीही ट्विटरवरुन पंकजांना शुभेच्छा दिल्या. त्यावर पंकजांनी, “चला भेटुया” अशा आशयाचं उत्तर दिलं.

“भाजपच्या राष्ट्रीय सचिव, लोकप्रिय नेत्या पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!” असे ट्वीट उर्मिला मातोंडकर यांनी दुपारच्या सुमारास केले. त्यावर “धन्यवाद, फारच गोड. आपण भेटलं पाहिजे” अशी प्रतिक्रिया पंकजांनी दिली. त्याला “कधीही, माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे” असं उत्तर उर्मिला यांनी दिलं.

प्रीतम मुंडेंकडून अनोख्या शुभेच्छा

पंकजा मुंडेंना शुभेच्छा देण्यासाठी प्रीतम मुंडेंनी फेसबुक आणि ट्विटर अशा दोन्ही माध्यमांचा वापर केला. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रीतम ट्विटमध्ये म्हणतात- ‘5 वर्षांची असशील! तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस आणि आजही आहेस. जिच्या छायेत सुरक्षित वाटत त्या आभाळा एवढ्या मनाच्या आणि जमिनीशी घट्ट जोडलेल्या संस्काराच्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा’.

तीन फोटो आणि त्यांची गोष्ट

पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रीतम मुंडे यांनी तीन फोटो ट्विट केलेत. तिन्ही फोटोत दोघी बहिणी आहेत. यातला पहिला फोटो हा दोघींच्या लहानपणीचा आहे. त्याच फोटोत पंकजा मुंडेंनी कानाला फोनचा रिसिव्हर लावलेला आहे. तर प्रीतम मुंडे बाजूला बसून हसत आहेत. त्यांच्या मांडीत एक बाहुलीही आहे. विशेष म्हणजे दोन्ही बहिणींनी सारखाच ड्रेस घातला आहे.

दुसरा फोटो त्यांचा अलिकडच्या काळातला आहे. यात दोन्ही बहिणी व्यासपीठावर बसलेल्या आहेत आणि त्यांच्यात काहीतरी संवाद सुरु आहे. त्यातही पंकजा प्रीतम यांना काही तरी सांगत आहेत आणि ते त्या मन लावून ऐकताना दिसत आहेत. तिसरा फोटो हा पुन्हा एका व्यासपीठावरचाच आहे. बहुतेक तो दसरा मेळाव्यातला असावा. इथेही पंकजा बोलत आहेत आणि प्रीतम मुंडे गर्दीकडे बघत असतानाच ऐकत असल्याचं दिसतं.

संबंधित बातम्या :

तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस, प्रीतम मुंडेंच्या पंकजांना खास फोटो शेअर करत शुभेच्छा

(Urmila Matondkar wishes Happy Birthday to BJP Leader Pankaja Munde her replies says we must meet)