“नितेश राणेंना खासगीत विचारा…” कुडाळ सभापतींच्या भाजपप्रवेशानंतर वैभव नाईकांचे प्रत्युत्तर

कुडाळ पंचायत समितीच्या सभापती नूतन आईर यांनी काल कणकवलीत नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमधे प्रवेश केला.

"नितेश राणेंना खासगीत विचारा..." कुडाळ सभापतींच्या भाजपप्रवेशानंतर वैभव नाईकांचे प्रत्युत्तर

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे आमदार दोन्ही निवडणुकीत एकाच पक्षातून एकाच चिन्हावर निवडून आले, नितेश राणेंना मात्र निवडून न येण्याच्या भीतीमुळे पक्ष बदलावा लागला, अशा शेलक्या शब्दात कुडाळचे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिले. नाईकांच्या मतदारसंघात शिवसेनेला धक्का देत राणेंनी कुडाळच्या सभापतींना भाजपात आणले. त्यानंतर सिंधुदुर्गातील शिवसेनेचे दोन्ही आमदार बिनकामाचे असल्याची टीका नितेश राणे यांनी केली होती. (Vaibhav Naik hits back at Nitesh Rane after Kudal Sabhapati joins BJP)

कुडाळ पंचायत समितीच्या सभापती नूतन आईर यांनी काल कणकवलीत नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमधे प्रवेश केला. त्यामुळे कुडाळ पंचायत समितीत आता भाजपची सत्ता आली आहे. त्यानंतर नितेश राणे यांनी शिवसेनेच्या दोन्ही आमदारांवर टीका केली होती. शिवसेनेचे दोन्ही आमदार बिनकामाचे असून काठावर पास झाले आहेत. मात्र 2024 च्या निवडणुकीत शिवसेनेचा सुपडा साफ होईल आणि जिल्ह्यात भाजपचेच आमदार खासदार निवडून येतील, असा दावाही नितेश राणेंनी केला होता.

नितेश राणेंच्या टीकेला उत्तर देताना वैभव नाईक म्हणाले, “शिवसेनेचे आमदार हे दोन्ही निवडणुकीत एकाच पक्षातून एकाच चिन्हावर निवडून आले. मात्र नितेश राणेंना निवडून न येण्याच्या भीतीमुळे पक्ष बदलावा लागला. ते जर भाजपमध्ये नसते तर त्यांची काय अवस्था झाली असती, ते नितेश राणेंना खासगीत विचारा” अशी खोचक टीका वैभव नाईक यांनी केली.

“कुडाळ सभापतींना राजीनामा देण्यास सांगितलं”

कुडाळ पंचायत समितीच्या सभापतींच्या दालनात त्यांचे पती ठेकेदारी चालवत होते. हे आपल्या कानावर आल्यानंतर आपण सभापतींना असले धंदे शिवसेनेत चालणार नाहीत, राजीनामा द्या, असे सांगितले होते. त्याचा राग आल्यामुळे त्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, असा दावाही वैभव नाईक यांनी केला. (Vaibhav Naik hits back at Nitesh Rane after Kudal Sabhapati joins BJP)

“यापूर्वी सभापती आणि त्यांचे पती हे ज्या पक्षात गेले त्यांच्यासोबतच होते. मात्र आता ते त्या पक्षात गेलेत त्यांना आमच्या शुभेच्छा आणि पक्षात घेणाऱ्यांनाही मनःपूर्वक  शुभेच्छा” अशी शालजोडीतही वैभव नाईक यांनी लगावले.

संबंधित बातम्या :

वैभव नाईकांच्या मतदारसंघात शिवसेनेला सुरुंग, नितेश राणेंच्या उपस्थितीत कुडाळच्या सभापती भाजपात

(Vaibhav Naik hits back at Nitesh Rane after Kudal Sabhapati joins BJP)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI