‘वर्षा’वर लिहिणाऱ्यांचे तोंड मात्र काळे झालं, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका

लिहिणाऱ्यांचे तोंड मात्र काळ झालं आहे," अशी टीका संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली  (Sanjay raut comment on varsha banglow drawing) आहे.

  • दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 15:41 PM, 28 Dec 2019
'वर्षा'वर लिहिणाऱ्यांचे तोंड मात्र काळे झालं, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका

मुंबई : मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या खोलीतील भिंतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह लिहिल्याचं समोर (Sanjay raut comment on varsha banglow drawing) आलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी निषेध व्यक्त केला. “असे मजकूर रंग मारुन मिटवता येतील. पण लिहिणाऱ्यांचे तोंड मात्र काळ झालं आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली  (Sanjay raut comment on varsha banglow drawing) आहे.

“वर्षा बंगल्यांच्या भिंतीवर लिहिलेल्या मजकूराचा संजय राऊतांनी निषेध व्यक्त केला आहे. वर्षाच्या भिंतीवर नेमंक काय लिहिलं हे माहित नाही. असे मजकूर रंग मारुन मिटवता येतात. पण लिहिणाऱ्यांचे मात्र तोंड काळं झालं आहे,” असे संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना (Sanjay raut comment on varsha banglow drawing) म्हणाले.

राज्याचं मुख्यमंत्री पद गेल्यामुळे फडणवीस कुटुंबाला वर्षा बंगला सोडावा लागला होता. वर्षा हे सरकारी निवास्थान सोडताना दिरंगाई केली होती. त्यानंतर हा बंगला नवीन मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे यांना राहण्यासाठी देण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी या बंगल्याची पाहणी केली असता काहींना वर्षा बंगल्याच्या भिंतीवर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिहिलं असल्याचे (varsha banglow wall drawing) आढळले.

VIDEO : UT वाईट आहेत, वर्षा बंगल्यांच्या भिंतींवर उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह लिखाण!

दिविजा फडणवीस राहत असलेल्या खोलीच्या भिंतीवर Who is UT? UT Is mean? Shut Up अशी वाक्य लिहिण्यात आली आहे. Who is UT? युटी कोण आहेत, UT Is mean? युटी वाईट आहेत असे वर्षा बंगल्याच्या भितींवर लिहिलं आहे. BJP is rock, Bjp and shivsena were friend, Fadnavis rock असेही या भितींवर लिहिलं आहे.

दिविजा राहत असलेल्या खोलीमधील सर्वच भिंतीवर अशाप्रकारे लिहिले आहे.  अशाप्रकारे भिंतीवर लिहिलेल्या या वाक्यांमुळे फडणवीस कुटुंब उद्धव ठाकरेंचा किती द्वेष करु लागलेत हे दिसून येत (Sanjay raut comment on varsha banglow drawing) आहे.