‘शॅडो’चेही ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’, राज ठाकरेंच्या सहकुटुंब बैठकीवर सरदेसाईंचा निशाणा

| Updated on: Jan 29, 2021 | 2:00 PM

'शॅडो' चे पण 'माझे कुटुंब - माझी जबाबदारी' असं म्हणत वरुण सरदेसाईंनी राज ठाकरे यांना टोला हाणला. (Varun Sardesai Raj Thackeray )

शॅडोचेही माझे कुटुंब माझी जबाबदारी, राज ठाकरेंच्या सहकुटुंब बैठकीवर सरदेसाईंचा निशाणा
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेची (MNS meeting) दुसरी महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत होत आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला त्यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे उपस्थित आहेतच, मात्र अमित यांच्या पत्नी आणि राज ठाकरे यांच्या सूनबाई मिताली ठाकरेही (Mitali Thackeray) हजर राहिल्या. युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी ठाकरे कुटुंबाच्या हजेरीवरुन निशाणा साधला. (Varun Sardesai taunts Raj Thackeray Amit Mitali attending MNS meeting)

कोरोना लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवताना ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ हा नारा महाविकास आघाडी सरकारने दिला. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी उचलावी, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुचवायचं आहे. मात्र मनसेने याआधी ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ यावरुन राजकीय टिप्पणी केली होती.

वरुण सरदेसाईंचा राज ठाकरेंना टोला

मनसेने ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या शॅडो कॅबिनेटवरुनही वरुण सरदेसाईंनी डिवचलं. ‘शॅडो’ चे पण ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ असं म्हणत सरदेसाईंनी आपल्या ‘मावसभावाच्या काकां’नाच टोला हाणला.

अमित आणि मिताली हे दाम्पत्यही मनसेच्या बैठकीला उपस्थित होते. राज्यातील मनसेचे नेते, सरचिटणीस, प्रमुख शहराध्यक्ष बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार आहेत.

मनसे नेत्यांच्या उपस्थितीत बैठक

आगामी महापालिका निवडणुका आणि पक्ष वाढीसाठी नवनवीन संकल्पना यावर इथे चर्चा होणार आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभयंकर, गजानन काळे यासारखे विविध नेते उपस्थित आहेत.

महापालिका निवडणुकांसाठी मनसेकडून विशेष समिती तयार करण्यात येणार आहे. या समितीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. मनसेची राज्यस्तरीय कोअर कमिटी तयार करुन, निवडणुकांची रणनीती आखली जाणार आहे. सर्व महापालिका स्तरावर ही एक कमिटी असेल. या कमिट्यांकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी असेल.

अमित-मितालीच्या लग्नाला दोन वर्षे

अमित आणि मिताली यांचा 27 जानेवारी 2019 रोजी विवाह सोहळा संपन्न झाला. नुकतंच त्यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण होत आहे. या दोन वर्षात आता अमित आणि मिताली हे दोघेही पक्षाचं काम करताना दिसत आहेत. (Varun Sardesai taunts Raj Thackeray Amit Mitali attending MNS meeting)

राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. लोकसभानिहाय सर्व वरिष्ठ नेते जातील आणि आढावा घेतील. अहवाल राज ठाकरे यांना दिला जाईल. 27 फ्रेब्रुवारीला मराठी भाषा दिन हा उत्सव म्हणून साजरा केला जाईल. मराठी स्वाक्षरी मोहीम घेतली जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः अनेक ठिकाणी स्वाक्षरी करण्यास जाणार आहेत. मराठी शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे. मनसेच्या गटअध्यक्षांना आता नवीन नाव – राजदूत असेल, अशी माहिती बाळा नांदगावकरांनी दिली.

9 मार्च हा पक्षाचा वर्धापनदिन आहे. यावेळी निवडणुका जवळ आलेल्या आहेत. 9 फ्रेबुवारी ते 12 एप्रिलपर्यंत सदस्य नोंदणी केली जाईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्याला जाणार आहेत. 1 ते 9 मार्च दरम्यान राज ठाकरे अयोध्यात जाणार आहेत, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

संबंधित बातम्या :

मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंची सूनही उपस्थित, मितालीने लक्ष वेधले

पुण्यात मनसेची मोर्चेबांधणी, राज ठाकरेंचा दोन दिवस पुणे दौरा

(Varun Sardesai taunts Raj Thackeray Amit Mitali attending MNS meeting)