AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आजपासून मंदिरं खुली झाली असं समजा’, प्रकाश आंबेडकरांचं विठ्ठल मंदिरात प्रवेश करत आंदोलन

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील मंदिरं खुली करावी, अशी मागणी करत पंढरपूरमध्ये आंदोलन केलं (Prakash Ambedkar strike in Pandharpur).

'आजपासून मंदिरं खुली झाली असं समजा', प्रकाश आंबेडकरांचं विठ्ठल मंदिरात प्रवेश करत आंदोलन
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 31, 2020 | 4:08 PM
Share

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर राज्यातील मंदिरं खुली करावी या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलन केलं (Prakash Ambedkar strike in Pandharpur). त्यांनी आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसह पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात प्रवेश करुन आंदोलन केलं. यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित वारकऱ्यांना आणि नागरिकांना आजपासून मंदिरं खुली आहेत असं समजून दर्शन घेण्याचं आवाहन केलं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही आमचं आंदोलन करणारच अशी भूमिका घेतली होती.

LIVE Updates:

  • ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचे जाहीर आभार, काल रात्रीपर्यंत इथंपर्यंत येऊ देतील का याबद्दल शंका होती : प्रकाश आंबेडकर
  • आजपासून मंदिरं खुली झाली असं समजा’, प्रकाश आंबेडकरांचं विठ्ठल मंदिरात प्रवेश करत आंदोलन
  • आंबेडकरांना त्यांच्या मागणीवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्याचं आश्वासन देत आंदोलन न करण्याची विनंती केली : गृहमंत्री अनिल देशमुख
  • पोलिसांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासह वारकरी सेनेचे पदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अशा 11 लोकांना मंदिरात सोडले

  • प्रकाश आंबेडकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा नाहीच, आंबेडकरांनी दीड तास वाट बघितली, प्रकाश आंबेडकर शासकीय विश्रामगृहावरुन आंदोलनस्थळाकडे रवाना, आंबेडकर आंदोलनावर ठाम, शांततेत आंदोलन व्हावं यासाठी पोलिसांकडून प्रयत्न
  • आंदोलनाला अनेक वारकरी संघटनांचा पाठिंबा, मात्र आंदोलनात सहभागी वारकऱ्यांची संख्या अत्यल्प
  • पंढरपुरात सुमारे आठशे ते एक हजार कार्यकर्ते दाखल, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मोजक्या कार्यकर्त्यांना नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी पोलिसांनी तयारी, प्रकाश आंबेडकर पोलिसांची विनंती कितपत आणि कशी मान्य करतात यावरच आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार
  • विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनासाठी अनेक कार्यकर्ते पंढरपुरात दाखल, वंचितच्या कार्यकर्त्यांना पंढरपूरमधील शिवाजी चौकात रोखले
  • प्रकाश आंबेडकर शासकीय विश्रामगृहात पोहोचले, थोड्याच वेळात जिल्हाधिकारीही शासकीय विश्रामगृहात पोहोचणार, त्यांच्याशी चर्चा झाल्यावर प्रकाश आंबेडकर आंदोलनस्थळी जाणार, विश्रामगृहात वारकरी प्रतिनिधीही हजर
  • सोलापूरमधून वंचितचे कार्यकर्ते पंढरपूरकडे रवाना, खासगी बसेस करुन कार्यकर्ते पंढरपूरच्या दिशेने
  • प्रकाश आंबेडकर मोहोळ मध्ये पोहोचले. येथून पंढरपूरकडे निघाले असून मध्ये कुठेही थांबणार नाही.

हेही वाचा : भाजपने माणसातला देव ओळखला नाही, ‘मंदिरं उघडा’ आंदोलनावरुन विजय वडेट्टीवारांची टीका

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “पंढरपूरमध्ये पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही आमचे आंदोलन करणार आहोत. आमच्या आंदोलनानंतर राज्यातील सर्व मंदिर खुली होतील. यापुढे मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. मी सरकारला मंदिरं खुली करण्यासाठी पटवून सांगणार आहे.” यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवरही सडकून टीका केली. भाजपने घंटानाद करण्यापेक्षा केंद्र सरकारला सांगावं आणि मंदिरं खुली करण्याचे आदेश देण्याची मागणी करावी, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : जो उत्साह दारु दुकाने उघडताना दाखवला, त्याच्या अर्धा तरी मंदिरं उघडण्यासाठी दाखवा : देवेंद्र फडणवीस

दरम्यान याआधी प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला मंदिरं खुली करा अन्यथा पंढरपूरमध्ये आंदोलन करु असा इशारा दिला होता. “दारु, गुटख्याची दुकानं चालू असताना विठ्ठल मंदिर बंद का? असा सवाल विश्व वारकरी सेनेचे संस्थापक ह.भ.प. अरुण महाराज बुरघाटे आणि ह.भ.प. शेट्ये महाराज यांनी सरकारला विचारला आहे. यावर राज्य सरकार प्रतिसाद देत नसल्याने 31 ऑगस्टला समस्त वारकरी बांधवांनी मोठ्या संख्येने पंढरपूरला जमावे,” असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं.

संबंधित बातम्या :

मंदिरांवर अनेकांचे उदरनिर्वाह, देव मंदिरात बंदिस्त व्हावे ही सरकारची भूमिका नाही : संजय राऊत

मंदिरात जाऊन देवदर्शन घेणं, हा प्रत्येकाच्या श्रध्देचा भाग, यात राजकारण करु नये – राजेश टोपे

Pandharpur Temple | विठ्ठल मंदिर दर्शनासाठी उघडा, वारकऱ्यांची सरकारकडे मागणी

संबंधित व्हिडीओ :

Prakash Ambedkar strike in Pandharpur

Follow Us
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप