…म्हणून वेदांता पुन्हा महाराष्ट्रात येण्याची शक्यता; रोहित पवारांनी सांगितलं कारण

लाखो लोकांना रोजगार मिळून देणारा वेदांतासारखा (Vedanta) प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणे ही चांगली गोष्ट नसल्याचं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

...म्हणून वेदांता पुन्हा महाराष्ट्रात येण्याची शक्यता; रोहित पवारांनी सांगितलं कारण
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 10:09 AM

अहमदनगर :  सध्या वेदांतावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यानं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना प्रत्युत्तर मिळत असल्याचं पहायला मिळत आहे.  याबाबत राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना विचारले असता, लाखो लोकांना रोजगार मिळून देणारा वेदांतासारखा (Vedanta) प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणे ही चांगली गोष्ट नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांकडून प्रयत्न होणं गरजेचं असल्याचेही ते म्हणाले आहेत.

नेमंक काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार यांनी वेदांता प्रकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.  वेदांता प्रकल्पाला महाविकास आघाडीने तळेगाव येथे जागा उपलब्ध करून दिली होती. त्यांना ती जागा  आवडली देखील होती. त्यांना सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र तरीही प्रकल्प गुजरातला गेला.

मात्र गुजरातमध्ये त्यांना जी जागा प्रकल्पासाठी देण्यात  आली आहे, ती जागा त्यांना आवडलेली नाही.  त्यामुळे पुन्हा एकदा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात  आणण्यासाठी सर्व नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

राम शिंदेंना टोला

दरम्यान यावेळी रोहित पवार यांनी भाजप नेते राम शिंदे यांना देखील टोला लगावला आहे.  त्यांनी मला आमदारकीचा राजीनामा देण्याचे चॅलेंज दिले होते. मी त्यांचे चॅलेंज स्विकारले देखील. मात्र आपण दोघेही राजीनामा देऊ असं मी त्यांना म्हटलो. त्यानंतर ते त्याबाबत एकही शद्ब बोलले नसल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं,

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.