Video : खासदार उदयनराजेंच्या हाती रिक्षाचे स्टेअरिंग! ‘जलमंदिर’ परिसरात मारला फेरफटका

| Updated on: Mar 01, 2022 | 5:55 PM

मधल्या काळात त्यांना पुष्पा सिनेमानं भुरळ घातली होती. तर काल-परवा त्यांनी 'चला हवा येऊ दे'च्या मंचावर थेट हवेतून एन्ट्री घेतली होती. आता उदयनराजे यांनी तिन चाकी रिक्षाचं (Auto Rickshaw) स्टेअरिंग हाती घेतलं आणि आपल्या 'जलमंदिर' परिसरात एक फेरफटकाही मारला!

Video : खासदार उदयनराजेंच्या हाती रिक्षाचे स्टेअरिंग! जलमंदिर परिसरात मारला फेरफटका
उदयनराजेंनी चालवली तीन चाकी रिक्षा
Image Credit source: TV9
Follow us on

सातारा : आपली हटके स्टाईल, बिनधास्त शैली आणि कॉलर उडवण्याची पद्धत, यामुळे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) नेहमीच चर्चेत असतात. कधी ते सातारच्या (Satara) रस्त्यावर सुसाट गाडी चालवताना पाहायला मिळतात. तर कधी कार्यकर्त्याच्या दुचाकीवर फेरफटका मारतात. मधल्या काळात त्यांना पुष्पा सिनेमानं भुरळ घातली होती. तर काल-परवा त्यांनी ‘चला हवा येऊ दे’च्या मंचावर थेट हवेतून एन्ट्री घेतली होती. आता उदयनराजे यांनी तिन चाकी रिक्षाचं (Auto Rickshaw) स्टेअरिंग हाती घेतलं आणि आपल्या ‘जलमंदिर’ परिसरात एक फेरफटकाही मारला!

खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे मित्र समुहाकडून रिक्षा स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यात मोठ्या प्रमाणात रिक्षाचालक सहभागी झाले. या स्पर्धेतील विजेत्या रिक्षा चालकाच्या पाठीवर उदयनराजेंनी थाप मारली. इतकंच नाही तर राजेंची विजेता रिक्षा हाती घेत आपलं निवासस्थान असलेल्या जलमंदिर परिसरात फेरफटका मारला. उदयनराजेंचा रिक्षा चालवतानाचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

उदयनराजे भोसले यांनी चालवली तीन चाकी रिक्षा

“चला हवा येऊ द्या”मध्ये ग्रँड एन्ट्री

उदयनराजे यांनी काही दिवसांपूर्वीच एकअसा स्टंट केलाय की तो पाहून तुम्हीही तोंडात बोट घातल्याशिवाय राहणार नाही. उदयनराजेंची ‘चला हवा येऊ द्या’ (Chala hawa yeu Dya) कार्यक्रमातली एन्ट्री एवढी कमाल होती की एखादा हॉलिवूड किंवा बॉलिवूडचा अभिनेताही त्यांच्यापुढे फोल ठरेल! उदयनराजेंनी चक्क बाईकवरून हवेतून या कार्यक्रमात एन्ट्री घेतली. यावेळी पुष्पा सिनेमाची किती क्रेझ आहे हेही दिसून आलं. काय ती तुफान एन्ट्री आणि काय तो स्वॅग, ही एन्ट्री पाहून साताकरांच्या डोळ्याचे पारणं फिटली. राजे काहीही करू शकतात हे राजेंनी पुन्हा सिद्ध केलं.

इतर बातम्या : 

Video : एकनाथ शिंदेंनी पारंपरिक रेला नृत्यावर आदिवासी तरुणांसोबत धरला ठेका!

‘महाविकास आघाडी आज राज्यात, उद्या देशातही होऊ शकते’, काँग्रेस मेळाव्यात मंत्री अमित देशमुख यांचं वक्तव्य