‘महाविकास आघाडी आज राज्यात, उद्या देशातही होऊ शकते’, काँग्रेस मेळाव्यात मंत्री अमित देशमुख यांचं वक्तव्य

आता काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी आता मोठं विधान केलंय. राज्यात जशी युती झाली आणि महाविकास आघाडी स्थापन झाली, असेच चित्र देशात दिसण्याची शक्याता आहे. असे विधान अमित देशमुख यांनी केलंय.

'महाविकास आघाडी आज राज्यात, उद्या देशातही होऊ शकते', काँग्रेस मेळाव्यात मंत्री अमित देशमुख यांचं वक्तव्य
वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य खात्याचे कॅबिनेट मंत्री अमित देशमुखImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 4:54 PM

औरंगाबाद : गेल्या विधानसभेवेळी राज्यात जे घडलं त्याने देशाला तोंडात बोट घालायला लावलं. कारण मोदी (Pm Modi) आणि शहांच्या (Amit Shah) ताकदीला राज्यात पवारांची युक्ती भारी पडली. शिवसेना आणि भाजपचा तीन दशकांचा घरोबा संपला आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) तयार झाली. त्यामुळे आमदारांची शंभरी पार करूनही भाजप सत्तेपासून वंचित राहिली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा गाजलेला पाहटेचा शपथविधीही काही तासात पवारांनी फेल केला. गेल्या अडीत वर्षापासून महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आहे. यावरूनच आता काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी आता मोठं विधान केलंय. राज्यात जशी युती झाली आणि महाविकास आघाडी स्थापन झाली, असेच चित्र देशात दिसण्याची शक्याता आहे. असे विधान अमित देशमुख यांनी केलंय. त्यामुळे पुन्हा जोरदार राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

राहुल गांधी नेतृत्व करतील

राज्यात महविकास आघाडी झाली आहे, तशीच उद्या देशातही महविकास आघाडी होऊ शकते आणि त्याचं नेतृत्व राहुल गांधी करतील असं वक्तव्य अमित देशमुख यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वाच्याच भुवया उचावल्या आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत, काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यानी त्या तयारीला लागावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे एकीकडे स्वबळाचा नारा आणि दुसरीकडे देशात युतीचं विधान त्यामुळे कार्यकर्तेही काही काळ कनफ्यूज झाल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपूर्वीच तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात दाखल होत मुख्यमंत्री आणि शरद पवारांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसशिवाय देशात तिसरी आघाडी होणार नाही असा सूर काँग्रेस नेत्यांनी लावल्याचे दिसून आले.

संभाजी राजेंबाबातही स्पष्टीकरण

येत्या काही दिवसातच राज्यात विविध निडणुका होणार आहेत. त्याच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहे. अनेक दौरे करत महाराष्ट्र पिंजून काढत आहे. त्यामुळे अमित देशमुख म्हणाले, उन्हाळ्यात, पावसाळ्यात महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील. त्याची तयारी चांगली करा. तसेच संभाजीराजेंच्या आंदोलनाबद्दल बोलताना, छत्रपती संभाजी राजे यांनी उपोषण सोडलं आहे, त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे संभाजी राजे हे महविकास आघाडी सोबत येऊन काम करायला तयार आहेत. असं वक्तव्य अमित देशमुख यांनी केलं होतं, मात्र यावरून स्पष्टीकरण देताना त्यांनी मागण्यांची पूर्तता होईपर्यंत संभाजी राजे सोबत काम करायला उत्सुक आहेत, असं स्पष्ट केलं आहे.

Video – पायाला भेगा, हाताला घट्टे हेच शेतकऱ्याच्या मुलीचे सौंदर्य, अमरावतीच्या पालकमंत्री ठाकूर यांनी टीकाकारांना सुनावले

भाजप नेत्यांवर कारवाई केली नाही म्हणून नगराळेंची उलचबांगडी?; वाचा पडद्यामागे काय घडलं?

पवारांच्या मेहरबानीवर ठाकरेंचे सुरू, राज्यपाल चुकतील असे वाटत नाही; राणेंचा दावा

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.