Udayanraje Bhonsle : उदयनराजे भोसले ‘पुष्पा : द राईज’वर फिदा, मित्रांसह घेतला सिनेमाचा आनंद

Udayanraje Bhonsle : उदयनराजे भोसले 'पुष्पा : द राईज'वर फिदा, मित्रांसह घेतला सिनेमाचा आनंद
उदयनराजे भोसले

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी मात्र कारण वेगळं आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी पुष्पा : द राईज (Pushpa The Rise) हा चित्रपट साताऱ्याच्या राजलक्ष्मी थिएटरमध्ये जाऊन पाहिला.

संतोष नलावडे

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 07, 2022 | 8:50 AM

सातारा: भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी मात्र कारण वेगळं आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी पुष्पा : द राईज (Pushpa The Rise) हा चित्रपट साताऱ्याच्या राजलक्ष्मी थिएटरमध्ये  (Rajlakshmi Theater) जाऊन पाहिला. उदयनराजे भोसले यांच्यासोबत काही मित्र आणि कार्यकर्ते देखील चित्रपट पाहण्यासाठी पोहोचले होते. पुष्पा चित्रपट खासदार उदयनराजे भोसले यांना आवडला असल्यानं सातारकरांमध्ये या सिनेमाची चर्चा आहे.

उदयनराजे भोसलेंनी मित्रांसह पाहिला सिनेमा

साताऱ्याचे भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा : द राईज’ या सिनेमाच्या प्रेमात पडले आहेत. त्यांनी साताऱ्यातील राजलक्ष्मी थिएटरमध्ये मित्रांसमवेत जाऊन पुष्पा हा चित्रपट पाहिला. थिएटरमध्ये जाऊन फिल्म पाहण्याची उदयनराजेंची ही पहिलीच वेळ नाही तर याआधी देखील अनेक चित्रपट थिएटरमध्ये जावून पाहिले आहेत.

‘पुष्पा: द राइज’ची सातऱ्यात चर्चा

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 300 ते 400 कोटींची कमाई केली आहे..तेलुगू व्यतिरिक्त हा सिनेमा हिंदी, मल्याळम, कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं सातारकरांना खास आकर्षण आहे. कारण हा दमदार सिनेमा भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना आवडला असून त्यांनी साताऱ्यातील राजलक्ष्मी थिएटरमध्ये मित्रांसोबत जावून हा चित्रपट पाहिला.

काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास करणाऱ्या सायली पाटीलचं अभिनंदन

अवघं 10 वर्षे वय असलेल्या सायली पाटील हिने काश्मीर ते कन्याकुमारीचा प्रवास सायकलवरुन पूर्ण केला. ठाण्याची सायली पाटील ही 10 वर्षाची मुलगी काश्मीर ते कन्याकुमारी हा प्रवास सायकलवरून करत आहे.. “बेटी बचाव बेटी पढाव” हा संदेश घेऊन ती साताऱ्यात आली. यावेळी जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजेंनी तिचे स्वागत करून तिला वाट्टेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

सायली ही काश्मीर ते कन्याकुमारी असा एकूण 4 हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. तिने आतापर्यंत 2200 किलोमीटर चा प्रवास सायकलवरून केला असून अजून 1800 प्रवास शिल्लक आहे. राहिलेला प्रवास 18 दिवस पूर्ण करण्याचा सायलीचा मानस आहे. 23 व्या दिवशी ती साताऱ्यात पोहचली तेव्हा तिचे जंगी स्वागत करण्यात आले. सायकल पट्टू सायलीला खासदार उदयनराजे भोसले यांनी शुभेच्छा दिल्या असून फ्रान्स येथील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाहिजे ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

इतर बातम्या :

दिल्लीत दिलजमाई, गल्लीत गोंधळ, सत्तार-दानवेंच्या भेटीने सोयगाव नगरपंचायतीत कार्यकर्ते का संभ्रमात?

BMC Home Isolation Guidelines | मुंबई पालिकेकडून गृह विलगीकरणासाठी गाईडलाईन्स जारी, नवे नियम काय ?

Udayanraje Bhonsle Satara BJP MP watch Pushpa the Rise of Allu Arjun and Rashmika Mandanna at Rajlakshmi Theater

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें