Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुकीची घोषणा, 20 जूनला मतदान

| Updated on: May 25, 2022 | 9:32 PM

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान पार पडणार असल्याचे आज जाहीर करण्यात आलंय. 20 जूनला या 10 जागांसाठी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. आहे.

Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुकीची घोषणा, 20 जूनला मतदान
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुकीची घोषणा, 20 जूनला मतदान
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीने (Rajyasabha Election) वातावरण तापलं असताना आता विधान परिषदेच्याही निवडणुकीची घोषणा झाली आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी (Vidhan Parishad Election) मतदान पार पडणार असल्याचे आज जाहीर करण्यात आलंय. 20 जूनला या 10 जागांसाठी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून (Election Commission) देण्यात आली. आहे. त्यासाठी 2 जूनला निवडणूक प्रक्रिया सुरु होणार आहे. 9 जून ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल अशीही माहिती देण्यात आली आहे. रामराजे निंबाळकर, सुभाष देसाई, प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत अशा अनेक दिग्गजांची टर्म संपत आहे. त्याच ठिकाणी नवे सदस्य निवडण्यासाठी ही निवडणूक पार पडत आहे. भाजपच्या 5 जणांचा कार्यकाळ संपतोय मात्र यावेळी 4 जागा या सध्याच्या संख्याबळानुसार निवडून येऊ शकतात, असा अंदाज बांधला जात आहे.

कुणाला पुन्हा संधी कुणाला डच्चू?

कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांमध्ये बड्या नावांचा समावेश आहे. रामराजे नाईक-निंबळकर हे सध्या विधान परिषदेचे विद्यमान सभापती आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी त्यांना पुन्हा संधी देत कायम ठेवणार की काही बदल करणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे प्रवीण दरेकर हे भाजपकडून विधान परिषदेवर आहेत आणि सध्या ते विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे त्यांनाही पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून आणखी एक लढणारा आक्रमक चेहरा म्हणजे सदाभाऊ खोत, त्यांचाही कार्यकाळ आता संपत आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून सदाभाऊ खोत यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनाही पुन्हा संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे.

दोन्ही निवडणुकांनी वातावरण तापवलं

राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या निवडणुका या एकापाठोपाठ एक आल्याने आता राज्यातलं राजकारण चांगलच तापलं आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून अजूनही राजकीय खडाखडी सुरू आहे. कारण तिकडे संभाजीराजेंनी अपक्ष लढण्याची हाक दिलीय. तर इकडे शिवसेनेने संजय पवार यांच्या नावाची घोषणा केलीय. शिवसेनेकडे पाठिंबा मागूनही राजेंना शिवसेनेने पाठिंबा न दिल्याने शिवसेनेवर सध्या राज्यभरातून टीकेची झोड उडालीय. तर दुसरीकडे विधान परिषदेतही काही असेच चित्र दिसून येण्याची शक्यता आहे. आता ही नवडणूक राज्याच्या राजकारणात आणखी रंगत आणत आहे. पाचवी जागा निवडून आणण्यासठी भाजप जोर लावण्याचीही दाट शक्यता आहे. मात्र आकड्याचं गणित कसं जुळणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

हे सुद्धा वाचा