AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रपुरात ‘प्रोटोकॉलची कुस्ती’, वडेट्टीवारांकडून महापौरांविरोधात पोलीस तक्रारीचे निर्देश

पालकमंत्र्यांनी महापौर राखी कंचर्लावार यांच्याविरोधात पोलीस तक्रार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

चंद्रपुरात 'प्रोटोकॉलची कुस्ती', वडेट्टीवारांकडून महापौरांविरोधात पोलीस तक्रारीचे निर्देश
| Updated on: Feb 14, 2020 | 5:40 PM
Share

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका महापौर चषका दरम्यान सध्या प्रोटोकॉलची कुस्ती पाहायला मिळत आहे. महापौर चषक निमंत्रण पत्रिके कुठलाही राजशिष्टाचार पाळण्यात आला नाही. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना नाव टाकण्यासंदर्भात विचारणाही करण्यात आली नाही. हाच धागा पकडून पालकमंत्र्यांनी महापौर राखी कंचर्लावार यांच्याविरोधात पोलीस तक्रार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत (Vijay Wadettiwar complaint against Chandrapur Mayor). त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमातील हा वाद प्रतिष्ठेचा होऊन आता पोलीस ठाण्यापर्यंत गेला आहे.

भाजपची सत्ता असलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेने महापौर कुस्ती चषक 2020 चं आयोजन केलं आहे. शनिवारी (15 फेब्रुवारी) चषकाला सुरुवात होणार आहे. मात्र, अशा स्थितीत कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेच्या वादावरून संपूर्ण चषकावर प्रोटोकॉलचं संकट ओढवण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. उद्घाटनाचा मान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा असताना माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना देण्यात आला. त्यामुळे संतापलेल्या पालकमंत्र्यांनी थेट महापौरांवर एफआयआर दाखल करण्याची भूमिका घेतली आहे.

मला न विचारता पत्रिकेत नाव टाकण्यात आलं आहे. तेही दुय्यमस्थानी. जनमानसात माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक कट रचण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला महापौर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत, असं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.

विशेष म्हणजे या सर्व प्रकरणातून मनपा आयुक्त संजय काकडे यांनी हात वर केले आहेत. आपण राजशिष्टाचारानुसार फायनल केलेली पत्रिका महापौरांनी मंजूर न करता स्वत:च्या मर्जीने पत्रिका तयार केली, अशी माहिती काकडे यांनी दिली. 15 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता सोहळ्याचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत उद्घाटक म्हणून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, अध्यक्षस्थानी सुधीर मुनगंटीवार, तर प्रमुख उपस्थिती म्हणून पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि अन्य नावं आहेत. यासंदर्भात महापौर राखी कंचर्लावार यांनी पत्रिका पूर्ण प्रोटोकॉलनुसार असल्याचा दावा केला. आम्ही पालकमत्र्यांचा मान राखतो म्हणून त्यांचं नाव पत्रिकेत टाकल्याचं महापौर राखी कंचर्लावार म्हणाल्या.

ही संपूर्ण स्पर्धा 3 टप्प्यात चालणार आहे. यासाठी राज्यभरातून शरीर सौष्ठव, कुस्ती आणि कबड्डी चमू पोहचले आहेत. मात्र स्पर्धेच्या उदघाटन पत्रिकेवरून वाद ओढवल्याने महापौर चषकात आता प्रोटोकॉलची चांगलीच कुस्ती रंगण्याची शक्यता आहे.

Vijay Wadettiwar complaint against Chandrapur Mayor

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.