Maratha Reservation | ‘त्या’ पदावरुन अशोक चव्हाणांना हटवा, एकनाथ शिंदेंची नियुक्ती करा, विनायक मेटेंची मागणी

| Updated on: Aug 08, 2020 | 5:23 PM

मराठा आरक्षणाबाबत सरकार झोपेचं सोंग करतंय, असा गंभीर आरोप शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि आमदार विनायक मेटे यांनी केला (Vinayak Mete on Maratha reservation).

Maratha Reservation | त्या पदावरुन अशोक चव्हाणांना हटवा, एकनाथ शिंदेंची नियुक्ती करा, विनायक मेटेंची मागणी
Follow us on

पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर समस्यांबाबत सरकार झोपेचं सोंग करतंय, असा गंभीर आरोप शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि आमदार विनायक मेटे यांनी केला आहे (Vinayak Mete on Maratha reservation). तसेच राज्य सरकारच्या मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटवण्याची मागणीही विनायक मेटे यांनी केली.

विनायक मेटे म्हणाले, “मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर समस्यांबाबत सरकार झोपेचं सोंग करतंय. त्यामुळं सरकारला जागं करावं लागणार आहे. त्यासाठी आंदोलन करावंच लागणार आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण विषयक उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून अशोक चव्हाण यांना हटवावे.”

अशोक चव्हाण यांच्याऐवजी मंत्री एकनाथ शिंदे किंवा इतर सक्षम मंत्र्याची अध्यक्षपदी नियुक्त करावी, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मराठा समन्वय समितीची महत्वाची राज्यव्यापी बैठक सुरु आहे. शिवसंग्रामचे संस्थापक आणि आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वात ही बैठक होत आहे. या समन्वय समितीत राज्यातील वेगवेगळ्या 10 ते 12 संघटनांचा सहभाग आहे. बैठकीत मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्न आणि आरक्षणासंदर्भात आंदोलनाच्या रणनीतीवर चर्चा झाली.

मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र यासंदर्भात राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप समन्वय समितीने केला आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीत सरकार आवश्यक काळजी घेत नाही. ठाकरे सरकार आणि अशोक चव्हाण सुद्धा काळजी घेत नाही. समाजाच्या प्रलंबित समस्यांसाठी सरकारचा निष्क्रिय आणि नाकर्तेपणा जबाबदार ठरत असल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केलाय.

हेही वाचा :

मुख्यमंत्र्यांनी वाढदिवशी मराठा समाजासोबत असल्याचा विश्वास द्यावा, आशीर्वाद मिळेल : विनायक मेटे

जर विठ्ठलच सगळं करणार असेल तर तुम्ही सत्तेत का? पायउतार व्हा : विनायक मेटे

विनायक मेटेंचा शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Vinayak Mete on Maratha reservation