AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांनी वाढदिवशी मराठा समाजासोबत असल्याचा विश्वास द्यावा, आशीर्वाद मिळेल : विनायक मेटे

स्टेअरिंग कोणाकडे यात आम्हाला रस नाही, तर प्रश्न कोण सोडवणार यात आहे, असे विनायक मेटे म्हणाले

मुख्यमंत्र्यांनी वाढदिवशी मराठा समाजासोबत असल्याचा विश्वास द्यावा, आशीर्वाद मिळेल : विनायक मेटे
| Updated on: Jul 27, 2020 | 10:59 AM
Share

पुणे : “राज्यात तीन मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे नावाला मुख्यमंत्री, मंत्रालयातून काम करणारे अजित पवार हे दुसरे मुख्यमंत्री, तर शरद पवार हे सुप्रीम मुख्यमंत्री आहेत” अशी टीका ‘शिवसंग्राम’चे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली. मराठा आरक्षणविषयी त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. “मुख्यमंत्र्यांनी आपल्या वाढदिवशी, आपण मराठा समाजासोबत आहोत हा विश्वास द्यावा, मराठा समाज त्यांना आशीर्वाद देईल” असेही मेटे म्हणाले. (Shivasangram Leader Vinayak Mete taunts CM Uddhav Thackeray)

“मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून शिवसंग्राम आणि इतर संघटना प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीस सरकार असताना हे आरक्षण टिकवण्याचे प्रयत्न केले. मात्र, काही लोक समाजात दुही माजवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले” असे मेटे म्हणाले.

हेही वाचा : “एक मुख्यमंत्री ‘मातोश्री’त, दुसरे राज्यभर फिरतात” चंद्रकांत पाटलांचे ‘एका दगडात दोन पक्षी’

“या सुनावणीचा परिणाम राज्यातील कोट्यवधी लोकांवर होणार आहे. ही सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होता कामा नये, ही आमची सुरुवातीपासून मागणी आहे. कारण या निकालाचा परिणाम हा दूरगामी असणार आहे” असेही विनायक मेटे म्हणाले.

“आरक्षण हा घटनात्मक विषय असल्याने तो घटनापीठाकडे सोपवणं आवश्यक आहे. यावरही आज बाजू मांडण्यात येईल. सरकारनेही व्हिडीओ कॉन्फरन्सवर सुनावणी नको, यावर ठाम राहावं. यात राजकारण आणता कामा नये” अशी अपेक्षा मेटेंनी व्यक्त केली.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव व्हिडीओ कॉन्फरन्सवरुन कामकाज करतात, अजित पवार मंत्रालयातून काम करतात. महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे, असा टोला विनायक मेटे यांनी लगावला. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीनचाकी रिक्षाचे स्टेअरिंग आपल्या हातात असल्याचे वक्तव्य केले होते.

हेही वाचा : जर विठ्ठलच सगळं करणार असेल तर तुम्ही सत्तेत का? पायउतार व्हा : विनायक मेटे

“स्टेअरिंग कोणाकडे यात आम्हाला रस नाही, तर प्रश्न कोण सोडवणार यात आहे. सरकारवर सगळे घटक नाराज आहेत. पक्षातील काही लोक खुश असतीलही. सरकार दुसऱ्या कोणी पाडायची गरज नाही, आपल्याच अंतर्गत कारणांनी पडणार. अंतर्विरोध सरकारमध्ये भरलेला आहे. हे सरकार अंतर्विरोधानेच जाणार” असा घणाघात विनायक मेटे यांनी केला.

“राज्यात तीन मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे हे नावाला मुख्यमंत्री आहेत. मंत्रालयातून काम करणारे अजित पवार हे दुसरे मुख्यमंत्री, तर शरद पवार हे सुप्रीम मुख्यमंत्री आहेत” अशी टीका मेटेंनी केली. (Shivasangram Leader Vinayak Mete taunts CM Uddhav Thackeray)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.