AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“एक मुख्यमंत्री ‘मातोश्री’त, दुसरे राज्यभर फिरतात” चंद्रकांत पाटलांचे ‘एका दगडात दोन पक्षी’

उद्धव ठाकरेंनी कद्रूपणा सोडावा आणि विरोधी पक्षाच्या आमदारांशी बोलावं, पुण्याची चिंता करावी, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला.

एक मुख्यमंत्री 'मातोश्री'त, दुसरे राज्यभर फिरतात चंद्रकांत पाटलांचे 'एका दगडात दोन पक्षी'
| Updated on: Jul 26, 2020 | 1:59 PM
Share

पुणे : राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत, एक मातोश्रीमध्ये, तर दुसरे राज्यभर फिरत आहेत, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांवर निशाणा साधला. ते पुण्यात बोलत होते. (Chandrakant Patil  taunts Sharad Pawar and Uddhav Thackeray saying two chief ministers of Maharashtra)

चार महिन्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला मुलाखत दिली. हिंमत असेल तर त्यांनी इतर माध्यमांना मुलाखत द्यावी, मुलाखत घेणारे शिवसेना खासदार संजय राऊत हे ठाकरेंचे स्तुतीपाठक आहेत, अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी केली.

उद्धव ठाकरेंनी कद्रूपणा सोडावा आणि विरोधी पक्षाच्या आमदारांशी बोलावं, पुण्याची चिंता करावी, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला. अजित पवार अपयशी ठरत आहेत, हे दाखवायचे प्रयत्न कोण करत आहे, हे तुम्ही पहा असे म्हणत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे चंद्रकांत पाटलांनी इशारा केला.

हेही वाचा : लॉकडाऊन वाढवू नका, नाहीतर उपासमारीने माणसं मरतील, प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

सरकार जाणार नाही, हे वक्तव्य कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठीच करत आहेत. अधिकाऱ्यांना 10 ॲागस्टपर्यंत बदल्या करताना विश्वास देण्यासाठी सरकार जाणार नाही हे सांगत आहेत, असेही पाटील म्हणाले.

तिघेही भांडतात, मग परत काहीच झालं नाही, असं सांगतात. राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत, एक मातोश्रीत, तर दुसरे राज्यभर फिरत आहेत, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला. सातवीच्या मुलाला सध्याच्या राजकीय स्थितीवर निबंध लिहायला सांगितला तरी ते लिहीतील, अशी टीका त्यांनी केली.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

पंकजा मुंडेंना वाढदिवसानिमित्त ई-चॉकलेट देऊ. त्यांना केंद्रात जबाबदारी देण्याचा विचार सुरु, असा पुनरुच्चार चंद्रकांत पाटलांनी केला.

(Chandrakant Patil  taunts Sharad Pawar and Uddhav Thackeray saying two chief ministers of Maharashtra)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.