आरोग्य विभागाची भरती पुढे ढकला, विनायक मेटेंची आक्रमक मागणी

काही मंत्री नोकरभरती रेटून नेण्याचं काम करत आहेत. त्यात राजेश टोपे यांचं खात आहे. पण ही भरती एक ते सव्वा महिने पुढे ढकला अशी मागणी आता मेटे यांनी केली आहे.

आरोग्य विभागाची भरती पुढे ढकला, विनायक मेटेंची आक्रमक मागणी
विनायक मेटे,नेते, शिवसंग्राम
| Updated on: Feb 24, 2021 | 2:21 PM

पुणे : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील 8 हजार 500 पदांची भरती जाहीर केली आहे. त्यासाठी 28 फेब्रुवारीला परीक्षा होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पण ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. काही मंत्री नोकरभरती रेटून नेण्याचं काम करत आहेत. त्यात राजेश टोपे यांचं खात आहे. पण ही भरती एक ते सव्वा महिने पुढे ढकला, अशी मागणी आता मेटे यांनी केली आहे.(Vinayak Mete demands postponement of recruitment in health department)

सर्वोच्च न्यायालयात 8 मार्चला मराठा आरक्षणावरील अंतिम सुनावणी होत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत जो निर्णय येईल तो मार्च महिन्यात येणार आहे. याबाबत सरकारकडे फक्त एख महिन्या राहिला आहे. त्यामुळे सरकार दरबारी वारंवार पाठपुरावा करत असल्याचं मेटे म्हणाले. राज्य सरकारनं जाहीर केलेली नोकरभरती एक ते सव्वा महिना पुढे ढकलावी, या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याचंही विनायक मेटे यांनी सांगितलं. काही मंत्री नोकरभरती रेटून नेत आहे. त्यात आरोग्य खात्याचा समावेश आहे. पण 1 एप्रिलपर्यंत ही नोकरभरती पुढे ढकलण्यात यावी अशी आग्रही मागणी मेटे यांनी केली आहे.

हे मंत्री मराठा समाजाचे वैरी – मेटे

दरम्यान, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात मंगळवारी पार पडलेली बैठक ही केवळ ढोंग होती, अशी टीका मेटेंनी केलीय. आघाडी सरकारला मराठा समाजाबाबत काही देणंघेणं नाही. सत्तेसाठी मराठा समाजाचा वापर केला जात असल्याचा आरोप करतानाच, सर्वकाही केंद्रानं करायचं मग यांनी फक्त भजे खात बसायचं का? असा सवालही मेटेंनी केलाय. नोकरभरती करण्यामध्ये मराठा समाजातील मंत्री पुढे आहेत. हे मंत्री मराठा समाजाचे वैरी आहेत, असा घणाघाती आरोप मेटे यांनी केला आहे.

आरोग्य विभागात 50 टक्के जागा भरणार

28 फेब्रुवारीला परीक्षा घेऊन आरोग्य विभागात 50 टक्के जाभा भरणार आहोत. मार्च महिन्यात ही भरती प्रक्रिया होईल, अशी घोषणा आरोग्यमंत्र्यांनी सोमवारी औरंगाबादेत केली आहे. आरोग्य विभागात एकूण 17 हजार जागा रिक्त आहेत. त्यापैकी साडे आठ हजार जागा भरल्या जाणार आहे. तर साडे आठ हजारांपैकी सुरुवातीला 5 हजार जागांसाठी ही भरती होणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

तयारीला लागा, राजेश टोपेंकडून परीक्षेची तारीख जाहीर, आरोग्य विभागात 50 टक्के जागा भरणार

आरोग्य विभागात 8 हजार 500 पदांची भरती, आरोग्य मंत्री राजेश टोपेंची घोषणा

Vinayak Mete demands postponement of recruitment in health department