AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : NDA च्या आजच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले….

Eknath Shinde : भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच सरकार येणार हे स्पष्ट आहे. आज एनडीएची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. या बैठकीला जाण्याआधी एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला.

Eknath Shinde : NDA च्या आजच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले....
CM Eknath Shinde
| Updated on: Jun 07, 2024 | 11:34 AM
Share

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे NDA चे नेते आहेत. शिवसेना भाजपाच नातं खूप जुनं आहे. विचारधारा एक आहे. आम्ही सुरुवातीपासून भाजपा एनडीए बरोबर कायम आहोत. आमचा पाठिंबा त्यांना आहे. आज एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक आहे. परवाच्या बैठकीत सर्व घटक पक्षांनी सर्वानुमते नरेंद्र मोदी यांना एनडीएच्या संसदीय पक्षाच नेता म्हणून निवडलं” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पहिली बैठक होत आहे. ही महत्त्वाची बैठक आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनावेत, हे सर्व देशवासियांच स्वप्न साकार होईल” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“विरोधी पक्ष अपयशी ठरले. मोदी हटाव बोलणाऱ्यांना जनतेने हटवलं. बहुमत एनडीएला दिलं. ही अभिमानाची बाब आहे. आमची आघाडी मोदींसोबत आहे. त्यांचे हात मजबूत करणार. 10 वर्षात काम करुन दाखवलं. अजून पाच वर्ष संधी मिळालीय. ही अभिमानाची बाब आहे. मागच्या 10 वर्षात देशाचा जेवढा विकास झाला, तेवढा मागच्या 50-60 वर्षात झालेला नाही” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

जनतेने त्यांनाच तडीपार केलय

“नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनणार हा ऐतिहासिक क्षण आहे. मोदींना पंतप्रधान बनवायचा आमचा उद्देश आहे, तो यशस्वी होतोय. मोदींना तडीपार करा बोलणाऱ्यांना जनतेने तडीपार केलय” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Follow Us
CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल
CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल, मोजक्या शब्दात घेतला समाचार
दिशा सॅलियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सॅलियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद