बाबरी मशीद बांधणाऱ्या नेत्याची बंगालमध्ये तुफान हवा, भाजपाला जबर धक्का, निकाल पाहून सगळेच थक्क!

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसला आहे. येथे भाजपाचे सरकार येणार आहे. दरम्यान, बाबरी मशीद बांधण्याची घोषणा करणाऱ्या नेत्याचा या निवडणुकीत विजय झाला की पराभव, असे विचारले जात आहे. याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.

बाबरी मशीद बांधणाऱ्या नेत्याची बंगालमध्ये तुफान हवा, भाजपाला जबर धक्का, निकाल पाहून सगळेच थक्क!
humayun kabir and west bengal election result
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 04, 2026 | 4:23 PM

West Bengal Election Result : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने अभूतपूर्वी मुसंडी मारील आहे. आता येथे भाजपाचे सरकार स्थापन होणार असून तृणमूल काँग्रेसला हा जबर धक्का आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पूर्ण ताकद लावली होती. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील बंगालमध्ये सभा घेतल्या होत्या. काहीही झालं तरी यावेळी सत्तापालट होणारच, असा विश्वास भाजपाकडून व्यक्त केला जात होता. आता प्रत्यक्ष बंगालमधील लोकांनी भाजपाच्या पारड्यात मतं दिल्याचे समोर आले आहे. दरम्यान, बंगालमध्ये तृणमूलच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. असे असतानाच आता बाबरी मशीद बांधण्याची मोहीम हाती घेणारे हुमायूँ कबीर यांच्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यांनी बंगालमध्ये दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

बाबरी मशीद बांधण्याची केली होती घोषणा

हुमायूँ कबीर यांचा या निवडणुकीत विजय झाला की पराभव, याकडे उत्सुकतेने पाहिले जात होते. हे हुमायूँ कबीर अगोदर तृणमूल काँग्रेस पक्षात होते. तृणमूलमध्ये असताना त्यांनी पश्चिम बंगालमध्ये बाबरी मशीद बांधण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर तृणमूल काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. मी मुर्शिदाबादच्या बेलडांगा येथे बाबरी मशीद बांधणार आहे, अशी थेट घोषणा त्यांनी केली होती. या मशिदीचे काम 11 फेब्रुवारी 2026 पासून सुरूदेखील झालेले आहे.

दोन्ही जागांवर हुमायूँ कबीर आघाडीवर

हुमायूँ कबीर यांनी रेजीनगर आणि नौवदा या दोन जागांवरून निवडणूक लढवत आहेत. कबीर यांचा स्वत:चा आम जनता उन्नयन पार्टी नावाचा पक्ष आहे. याच पक्षाकडून ते निवडणूक लढवत होते. सध्या या दोन्ही मतदारसंघात ते आघाडीवर आहेत. नौवदा या मतदारसंघात ते पहिल्या क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर भारतीय जनता पार्टीचे राणा मंडल हे आहेत. तिसऱ्या क्रमांकावर तृणमूल काँग्रेसच्या शाहिना खान या आहेत. रेजीनगर या मतदारसंघातही हुमायूँ कुमार हे साधारण 37 हजार मतांनी आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भाजपाचे बापन घोष तर तिसऱ्या क्रमांकावर तृणमूल काँग्रेसचे अतुर रहमान हे आहेत. या दोन्ही जागांवर हुमायूँ कबीर यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, बंगलाच्या निवडणुकीत तृणमूल पक्ष 90 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा पक्ष 197 जागांवर पुढे असून येथे भाजपाचेच सरकार येणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.

Follow Us