Solapur : शिंदे गटात सहभागी झालेल्या शिवसेना तालुका उपप्रमुखाची दोन दिवसांतच घरवापसी, नेमके कारण काय?

सोलापूर जिल्ह्यातील आक्कलकोट तालुक्याचे उपप्रमुख आनंद भक्कानुरे हे शिंदे गटात सहभागी झाले होते. शिवसेनेचा पदाधिकारी शिंदे गटात हे काही आता नवे राहिलेलेल नाही. मात्र, भुक्कानुरेंची चर्चा सुरु झाली ती त्यांनी शिंदे गटालाच जय महाराष्ट्र करीत पुन्हा शिवसेनेत सहभागी झाले याची. एवढेच नाही तर ज्या अपेक्षा शिंदे गटाकडून होत्या त्याबाबत आपला भ्रमनिरास झाल्याचे ते म्हणाले आहे.

Solapur : शिंदे गटात सहभागी झालेल्या शिवसेना तालुका उपप्रमुखाची दोन दिवसांतच घरवापसी, नेमके कारण काय?
शिंदे गटात गेलेले भक्कानुरे हे दोन दिवसांमध्येच शिवसेना पक्षात परतले आहेत.
| Edited By: | Updated on: Aug 21, 2022 | 3:06 PM

सोलापूर : गेल्या दीड महिन्यामध्ये केवळ (Shivsena) शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश हेच सर्वांच्या ऐकण्यात आहे. आमदार, खासदार एवढेच नाहीतर आता पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने (Eknath Shinde) शिंदे गटात सहभागी होत आहे. मात्र, सोलापुरात काही वेगळेच घडले आहे. दोन दिवसांपूर्वीच शिंदे गटात सहभागी झालेले (Solapur) अक्कलकोटचे तालुका उपप्रमुख पुन्हा शिवसेनेत परतले आहेत. एवढेच नाही तर शिंदे गटात आपला भ्रमनिराश झाला शिवाय त्यांच्याकडून फूस लावण्यात आल्याने मी निर्णय घेतला पण दोन दिवसांमध्ये सर्व गोष्टी लक्षात आल्याने आपण स्वगृही परतल्याचे आनंद भक्कानुरे यांनी सांगितले आहे. तर शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीमध्ये त्यांची घरवापसी झाली आहे. त्यामुळे हे चित्र असेच बदलते राहणार का हे देखील पहावे लागणार आहे.

दोन दिवसांमध्येच भ्रमनिराश

सोलापूर जिल्ह्यातील आक्कलकोट तालुक्याचे उपप्रमुख आनंद भक्कानुरे हे शिंदे गटात सहभागी झाले होते. शिवसेनेचा पदाधिकारी शिंदे गटात हे काही आता नवे राहिलेलेल नाही. मात्र, भुक्कानुरेंची चर्चा सुरु झाली ती त्यांनी शिंदे गटालाच जय महाराष्ट्र करीत पुन्हा शिवसेनेत सहभागी झाले याची. एवढेच नाही तर ज्या अपेक्षा शिंदे गटाकडून होत्या त्याबाबत आपला भ्रमनिरास झाल्याचे ते म्हणाले आहे. त्यांनी हे कारण दिले असले तरी दोन दिवसांमध्येच असा काय भ्रमनिराश झाला ते भक्कानुरे थेट शिवसेनेकडेच परतले . मात्र, त्यांच्या या निर्णयानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

अखेरच्या श्वासापर्यंत शिवसेनेत

राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर सोलापुरातील अक्कलकोट तालुक्याचे शिवसनेचे तालुका उपप्रमुख आनंद भक्कानुरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र, अवघ्या दोन दिवसात त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितत त्यांनी हा स्वगृही प्रवेश केलाय. दरम्यान, मला शिंदे गटाकडून फूस लावण्यात आली होती. मात्र, दोन दिवसातच माझी मोठा भ्रमनिरास झाल्याने ते शिवसेनेत परतले आहेत.आता मरेपर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहण्याचा खुलासा शिंदे गटातून शिवसनेत परतलेल्या अक्कलकोटच्या माजी उपतालुका प्रमुखाने केला आहे.

हीच ती वेळ..!

अडचणीच्या काळात उद्धव ठाकरे यांची साथ सोडून अनेकांनी वेगळा मार्ग निवडला आहे. शिवाय भक्कानुरे हे देखील शिंदे गटात सहभागी झाले होते पण उद्धव ठाकरे यांचीच खरी शिवसेना असे म्हणत ते दोन दिवसांमध्येच परतले आहेत. एवढेच नाहीतर इतरांनीही परत यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांना साथ देण्याची हीच योग्य वेळ असल्याचेही भक्कानुरे यांनी सांगितले आहे. मात्र, दोन दिवसांमध्ये त्यांचा असा काय भ्रमनिराश झाला हा प्रश्न उपस्थित राहत आहे.