आधी येडियुरप्पा पडले, मग कुमारस्वामींना पाडलं, भाजपचा कर्नाटक पॅटर्न नेमका काय?

भाजप वगळता सर्वपक्षीयांना आमदार फुटण्याची भीती आहे. त्यामुळेच संजय राऊत यांनी पडद्यामागे ‘कर्नाटक पॅटर्न’ राबवण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप केला.

आधी येडियुरप्पा पडले, मग कुमारस्वामींना पाडलं, भाजपचा कर्नाटक पॅटर्न नेमका काय?

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on BJP Karnatak Pattern) यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन, सत्तासंघर्षातील सद्यस्थितीवर भाष्य केलं.  पडद्यामागे ‘कर्नाटक पॅटर्न’ राबवण्याचा भाजपचा डाव आहे, असा सनसनाटी आरोप संजय राऊत (Sanjay Raut on BJP Karnatak Pattern) यांनी केला.  महाराष्ट्रात (Maharashtra government crisis) अद्याप भाजप-शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावरुन वाद सुरुच आहे. त्यामुळे तिढा वाढला आहे. अशावेळी भाजप वगळता सर्वपक्षीयांना आमदार फुटण्याची भीती आहे. त्यामुळेच संजय राऊत यांनी पडद्यामागे ‘कर्नाटक पॅटर्न’ राबवण्याचा भाजपचा (Maharashtra government crisis)डाव आहे, असा आरोप केला.

कर्नाटक पॅटर्न नेमका काय?

कर्नाटकात मे 2018 मध्ये विधानसभेच्या निवडणुका (Karnataka assembly election results) झाल्या. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. 104 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर काँग्रेसला  78 आणि जेडीएसने 38 जागा जिंकल्या. बहुमताचा 112 आकडा कोणालाही गाठता न आल्याने मोठा पेच निर्माण झाला.

अशा परिस्थितीत काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करण्यासाठी मोकळीक दिली. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसकडे मिळून 116 आमदारांचं बळ झालं.

मात्र तरीही राज्यपालांनी मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं. हे प्रकरण कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टात मध्यरात्री दोन ते पहाटे पाच वाजेर्यंत युक्तीवाद झाला. त्यानंतर कोर्टाने भाजपला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यामुळे येडियुरप्पांनी (BS Yediyurappa) अखेर 17 मे 2018 रोजी सकाळी नऊ वाजता कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

दीड दिवसांचे मुख्यमंत्री

पण येडियुरप्पा बहुमत सिद्ध करु न शकल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. 19 मे 2018 रोजी येडियुरप्पा यांनी राजीनामा आणि भाजप सरकार कोसळलं.

तिसऱ्या क्रमांकावरील कुमारस्वामी मुख्यमंत्री

येडियुरप्पांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएस यांनी मिळून सत्ता स्थापनेचा दावा केला. कुमारस्वामींच्या पक्षाला केवळ 38 जागा मिळाल्या होत्या, तरीही ते मुख्यमंत्री झाले.

कर्नाटकात घोडेबाजार

जेडीयू आणि काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं, पण ते सुद्धा काही महिनेच. कर्नाटकात वर्षभर घोडेबाजाराला ऊत आला आणि अखेर जेडीयू आणि काँग्रेसची सत्ता उलथवून लावत भाजपनं कर्नाटक काबीज केलं. 23 जुलै 2019 रोजी कुमारस्वामी सरकार पडलं. वर्षभरात काँग्रेस-जेडीएसच्या 17 आमदारांनी राजीनामा दिल्याने कुमारस्वामी अल्पमतात आलं. त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही. त्यामुळे कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार 14 महिन्यात कोसळले. कुमारस्वामी यांनी सादर केलल्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 99 तर विरोधात 105 मते पडली. सरकार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेत राजीनामा सादर केला.

येडियुरप्पा पुन्हा मुख्यमंत्री

कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएस यांचं सरकार पडल्यानंतर दोन दिवसात भाजपने सत्ता स्थापन केली. भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. येडियुरप्पा यांना 31 जुलैपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागलं होतं. त्यांनी त्यावेळी करुन दाखवलं.

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018

  • भाजप 104
  • काँग्रेस 78
  • जनता दल (सेक्युलर) 37
  • बहुजन समाज पार्टी 1
  • कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1
  • अपक्ष 1

संबंधित बातम्या 

कर्नाटकात नवा ट्वीस्ट, विधानसभा अध्यक्षांकडून 3 आमदारांचं निलंबन   

कर्नाटक सरकार अवघ्या 4 मतांनी कोसळलं, भाजपचं ‘मिशन कमळ’ यशस्वी   

दोन वेळा मुख्यमंत्रीपद मिळालं, पण कुमारस्वामींचं दोन्हीही वेळा ‘बॅड लक’  

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI