Jayakumar Rawal : कोण म्हणतं सेनेला कमी निधी, 5 कॅबिनेट अ्न 40 टक्के निधी, रावल यांनी दिले स्पष्टीकरण

| Updated on: Aug 17, 2022 | 7:55 PM

शिंदे सरकारवर निधीवाटपावरुन आरोप होऊ लागला आहे. ज्या निधीचे कारण सांगून शिवसेनेतून बंड करुन एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर सरकारची स्थापना केली येथेही त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. शिवाय चांगली खाती भाजपाने स्वत:कडे तर ठेवलीच पण आता निधीवाटपातही दुजाभावच केला आहे. मात्र, हे आरोप म्हणजे संभ्रम निर्माण करण्यासाठी आहेत.

Jayakumar Rawal : कोण म्हणतं सेनेला कमी निधी, 5 कॅबिनेट अ्न 40 टक्के निधी, रावल यांनी दिले स्पष्टीकरण
आ. जयकुमार रावल
Follow us on

मुंबई : (Allocation of funds) निधीवाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करीत ज्यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली त्यांच्या पदरी तरी काय पडले असा आरोप आता विरोधकांकडून केला जात आहे. (BJP Party) भाजपाने केवळ मंत्रिपदेच नाहीतर अधिकचा निधीही घेतल्याच्या आरोपावरुन (Jayakumar Rawal) जयकुमार रावल यांनी सर्वकाही उकल करुन सांगितले आहे. मंत्रीपदात आणि निधीवाटपात कोणताही दुजाभाव करण्यात आलेला नाही. मुळात हे आरोप कोण करतंय असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीला टार्गेट केले आहे. ज्यांनी शिवसेना संपवायचे काम केले ते आज निधी कमी दिल्याचे सांगत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शिवसेनेला केवळ 11 टक्के निधी दिला जात होता. आता तोच निधी 40 टक्क्यांवर गेल्याचे रावल यांनी सांगितले आहे. विरोधकांच्या आरोपाला जयकुमार रावल यांनी उत्तर दिले असून शिंदे सरकारमध्ये सर्वकाही अलबेल असल्याचे सांगितले आहे.

‘मविआ’ सरकारच्या काळात केवळ 11 टक्के निधी

शिंदे सरकारवर निधीवाटपावरुन आरोप होऊ लागला आहे. ज्या निधीचे कारण सांगून शिवसेनेतून बंड करुन एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर सरकारची स्थापना केली येथेही त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. शिवाय चांगली खाती भाजपाने स्वत:कडे तर ठेवलीच पण आता निधीवाटपातही दुजाभावच केला आहे. मात्र, हे आरोप म्हणजे संभ्रम निर्माण करण्यासाठी आहेत. प्रत्यक्षात शिंदे गटाला 5 कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली आहेत शिवाय निधीचेही 60-40 टक्के असेच वाटप झाल्याचे जयकुमार रावल यांनी सांगितले आहे. शिवाय महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेला केवळ 11 टक्के निधी दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपमध्ये युवकांना संधी

भाजपाची केंद्रीय निवडणुक समितीची स्थापना झाली आहे. यामध्ये नितीन गडकरींना थांबवून देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करुन घेण्यात आला आहे. त्यामुळे कुठेतरी भाजप श्रेष्ठी वेगळा प्लॅन करीत आहे का अशी चर्चा आता रंगू लागली आहे. मात्र, भाजपा हा बदल स्विकारणारा पक्ष आहे. शिवाय युवा चेहऱ्याला संधी मिळावी म्हणून गडकरी यांनी माघार घेतली असावी असे रावल यांनी सांगितले आहे. तर पक्षाच्या संघटन बांधणीत युवकांना संधी असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस यांना कामाची पावती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या केंद्रीय निवडणुक समितीमध्ये वर्णी लागली आहे. त्यांनी राज्यात यशस्वी केलेले प्रयोग आणि त्याचबरोबर बिहार, गोवा याठिकाणीही पक्ष संघटन मजबून केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत केंद्राने त्यांची निवड केली असावी असेही रावल यांनी सांगितले आहे. यामाध्यमातून त्यांना मोठी संधी मिळाली असून त्याचेही ते सोने करतील यात शंका नसल्याचे रावल यांनी सांगितले आहे.