AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 कोटींसाठी मी त्याच्या पाया पडावं..; तुरुंगातून बाहेर आल्यावर राजपाल यादवचा मोठा खुलासा

तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर अभिनेता राजपाल यादवने पत्रकार परिषद घेत त्याची बाजू मांडली. मुंबईत घेतलेल्या या पत्रकार परिषदेत त्याने संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे आणि ही अहंकाराची लढाई कशी झाली, त्याविषयी सांगितलं.

5 कोटींसाठी मी त्याच्या पाया पडावं..; तुरुंगातून बाहेर आल्यावर राजपाल यादवचा मोठा खुलासा
Rajpal Yadav Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 02, 2026 | 9:05 AM
Share

चेक बाऊन्स प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर अभिनेता राजपाल यादवने शनिवारी 28 फेब्रुवारी रोजी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याने त्याच्या 9 कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. यावेळी त्याचे वकील भास्कर उपाध्यायसुद्धा उपस्थित होते. राजपालने सांगितलं की, ज्या कंपनीकडून त्याने त्याच्या चित्रपटासाठी पैसे घेतले, ते सगळं घरचंच प्रकरण होतं. ज्या करारावर त्याने स्वाक्षरी केली होती, ते पूर्णपणे विश्वासावर आधारित होतं. राजपालने त्याच्या कर्जाबद्दल मीडियाला सांगितलं की, “जेव्हा का करार झाला, तेव्हा भास्करजी या संपूर्ण प्रकरणात कुठेही दिसत नव्हते. मी 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. जर मी मागे वळून पाहिलं तर मला प्रत्येक करारात काही ना काही त्रुटी आढळतील. जेव्हा हा करार झाला, तेव्हा मला कधीच वाटलं नव्हतं की हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचेल. ही फक्त अहंकाराची लढाई बनली आहे.”

“त्याला माणसाला मी फक्त 5 कोटी रुपयांसाठी त्याच्या पाया पडावं असं वाटतं. तो पैशांचा भुकेला नाही, तो सन्मानाचा भुकेला आहे. जर हे प्रकरण फक्त पैशांबद्दल असतं, तर मी 2013 पासून पैसे देण्यास तयार झालो असतो. पैसे सर्वांत आधी माझ्याकडे आले. मी दिल्लीतील लक्ष्मीनगर इथल्या त्याच्या ऑफिसमध्ये गेलो आणि कागदपत्रे न वाचता आंधळेपणाने त्यावर सही केली. तिथेच माझी मोठी चूक झाली. हे संपूर्ण प्रकरण फक्त कौटुंबिक बाब असल्यामुळे मी त्यात वकिलाचा समावेश केला नव्हता. मी फक्त समोरच्या व्यक्तीच्या शब्दांवर आणि नात्यावर विश्वास ठेवला होता”, असं तो पुढे म्हणाला.

चित्रपटाच्या नुकसानीबद्दल राजपालने सांगितलं, “मी विचार केला की जी व्यक्ती 1000 ते 1500 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक असेल, ती फक्त 5 कोटी रुपयांसाठी कोर्टात का जाईल? यात कोणताही वकील समाविष्ट नव्हता, माझ्या पत्नीला काहीच माहीत नव्हतं. आमच्यात झालेल्या करारानुसार, चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ते 5 कोटींच्या जागी 8 कोटी रुपये परत घेतील आणि उरलेला नफा माझा असेल. परंतु चित्रपटाने फक्त एक कोटी रुपयेच कमावले होते.”

याप्रकरणी राजपाल पुढे काही म्हणण्याच्या आत त्याच्या वकिलांनी त्याला थांबवलं आणि म्हणाले, “जर तुम्ही म्हणत असाल की त्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं चुकीचं होतं का? तर राजपालने ती चूक केली आहे.” राजपाल सध्या 1.5 कोटी रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनावर तुरुंगातून सुटला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 मार्च रोजी होणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...