भगतसिंह कोश्यारी पुन्हा उत्तराखंडच्या राजकारणात सक्रिय होणार? चंद्रकांत पाटलांनी नियमच सांगितला

| Updated on: Dec 24, 2021 | 3:24 PM

भगतसिंह कोश्यारी यांच्यावर बोलण्या इतका मी मोठा नाही तर एक छोटा कार्यकर्ता आहे. भगतसिंह कोश्यारी पुन्हा राजकारणात सक्रिय होणार की नाही माहिती नाही. पण भाजपमध्ये 75 वर्षानंतर कोणतेही नेते निवडणुकीत सक्रिय नसतात हा अलिखित नियम असल्याचं पाटील म्हणाले आहेत.

भगतसिंह कोश्यारी पुन्हा उत्तराखंडच्या राजकारणात सक्रिय होणार? चंद्रकांत पाटलांनी नियमच सांगितला
भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल, महाराष्ट्र
Follow us on

कोल्हापूर : देशात काही राज्यांच्या राज्यपालांमध्ये नुकताच बदल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा उत्तराखंडच्या राजकारणात सक्रीय होण्याची एक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. भगतसिंह कोश्यारी यांच्यावर बोलण्या इतका मी मोठा नाही तर एक छोटा कार्यकर्ता आहे. भगतसिंह कोश्यारी पुन्हा राजकारणात सक्रिय होणार की नाही माहिती नाही. पण भाजपमध्ये 75 वर्षानंतर कोणतेही नेते निवडणुकीत सक्रिय नसतात हा अलिखित नियम असल्याचं पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी पुन्हा राजकारणात सक्रिय होणार की नाही याबाबत माहिती नसल्याचं पाटील म्हणाले. (Will Bhagat Singh Koshyari be active in Uttarakhand politics again?)

कोश्यारी उत्तराखंडमध्ये परत जाण्यास इच्छुक?

भगतसिंह कोश्यारी यांनी मिश्किल भाष्य करत उत्तराखंडमध्ये परत जाण्याची इच्छा व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी उद्देशून यासंबंधी भाष्य केलं. कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ते सांगलीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

भगतसिंह कोश्यारी यांचे मिश्किल भाष्य

बेबी राणी मौर्य यांनी उत्तराखंडच्या राज्यपालापदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनेक राज्यांचे राज्यपाल 10 सप्टेंबर रोजी बदलले. यामध्ये उत्तराखंडचा कार्यभार सेवानिवृत्त ले. जनरल. गुरमित सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला. केंद्रीय पातळीवर या साऱ्या घडामोडी घडत असताना आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जयंत पाटील यांना उद्देशून मिश्किल भाष्य केलं. त्यांमनी अतिवृष्टीचा आधार घेत जयंत पाटील यांना वाटत असेल तर मी लवकरात लवकर इथून निघून जाईल, असं वक्तव्य केलं.

भगतसिंह कोश्यारी नेमंक काय म्हणाले ?

“नेहमी अतिवृष्टी पूर अशी संकटं असलेल्या भागातून मी आलोय. महाराष्ट्रात दुष्काळी स्थिती नेहमी असायची. पण मी राज्यपाल म्हणून महाराष्ट्रात आल्यापासून येथेही पाऊस सुरू झालाय. अतिवृष्टी होत आहे. जर हे जंयत पाटील यांना वटत असेल तर मी लवकरात लवकर हे सोडून निघून जाईल. असंच तर नुकसान झालं नसेल ना जंयत साहेब ?” असे कोश्यारी म्हणाले.

साकिनाका बलात्कार प्रकरणावरुन संताप व्यक्त

चंद्रकांत पाटील यांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केलीय. माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे समाज हादरुन गेलाय. ज्या प्रकारे ही घटना घडली आहे, यात अनेकजण आहेत. कडक शिक्षा झाली पाहिजे. त्या शिवाय अशा प्रवृत्तींना धाक निर्माण होणार नाही. गेल्या चार दिवसातील ही सहावी घटना आहे. महिलांवर अत्याचार होत असताना कारवाई होत नसल्यामुळे अशा घटनांमधील सराईतपणा वाढल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केलीय. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

इतर बातम्या :

राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ, नीलम गोऱ्हेंनी मुख्यमंत्र्यांना दिले 4 महत्वाचे सल्ले

आधी उत्तराखंड आणि नंतर कर्नाटक, आता गुजरात, भाजपात मुख्यमंत्री बदलाची मालिका; नेमकं कारण काय काय? वाचा सविस्तर

Will Bhagat Singh Koshyari be active in Uttarakhand politics again?