कलम 370 काढलं तर आम्ही भारतापासून वेगळे होऊ, फारुख अब्दुल्लांची धमकी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

श्रीनगर : भाजपने लोकसभा निवडणुकीच्या संकल्पपत्रात जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचं आश्वासन दिलंय. यावर आता जम्मू काश्मीरमधील नेते चवताळले आहेत. कलम 370 आणि कलम 35A मुळे जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळतो. पण नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि खासदार फारुख अब्दुल्ला यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. भाजपने कलम 370 काढून घेतल्यास आमचा स्वतत्र होण्याचा मार्ग मोकळा […]

कलम 370 काढलं तर आम्ही भारतापासून वेगळे होऊ, फारुख अब्दुल्लांची धमकी
Follow us on

श्रीनगर : भाजपने लोकसभा निवडणुकीच्या संकल्पपत्रात जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचं आश्वासन दिलंय. यावर आता जम्मू काश्मीरमधील नेते चवताळले आहेत. कलम 370 आणि कलम 35A मुळे जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळतो. पण नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि खासदार फारुख अब्दुल्ला यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. भाजपने कलम 370 काढून घेतल्यास आमचा स्वतत्र होण्याचा मार्ग मोकळा होईल, असं ते म्हणाले.

“त्यांना (भाजप) काय कलम 370 काढायचं आहे का? बाहेरुन लोक आणतील आणि त्यांना स्थायिक करतील? आमची संख्या कमी करतील? आम्ही झोपून राहू का? आम्ही त्यांचा सामना करु. कलम 370 कसं संपवतील? अल्लाह कसम, अल्लाहला हेच मंजूर असेल, आपण यांच्यापासून वेगळं होऊ. कराच, आम्हीही पाहू. पाहतो मग कोण यांचा झेंडा हातात घेण्यासाठी तयार होतंय,” असं वक्तव्य त्यांनी केलं.

फारुख अब्दुल्ला यांनी भाजपला कलम 370 हटवण्याचं आश्वासन दिलं. असं काहीही करु नका, ज्याने आमची मनं दुरावली जातील. यामुळे आमच्या स्वातंत्र्याचा मार्ग पुन्हा तयार होईल, असं ते म्हणाले.

एकीकडे भाजपने कलम 370 काढण्याचं आश्वासन दिलंय, तर दुसरीकडे काँग्रेसने कलम 370 हटवणार नाही, असं त्यांच्या जाहीरनाम्यात स्पष्ट केलंय. त्यामुळे फारुख अब्दुल्ला, पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनीही भाजपच्या आश्वासनावर टीका केली आहे. हे कलम काढल्यास आमच्यासाठी स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा होईल, असं मुफ्ती म्हणाल्या.