यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणूक : महाविकास आघाडीसमोर भाजपचं तगडं आव्हान

| Updated on: Jan 31, 2020 | 9:13 AM

यवतमाळ : यवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी आज (शुक्रवार 31 जानेवारी) मतदान होत आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर भाजपकडून सुमीत बाजोरीया यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे यवतमाळची निवडणूक चुरशीची आणि तितकीच प्रतिष्ठेची (Yawatmal Vidhan Parishad Bypoll Voting) होणार आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरपरिषदा, नगर पंचायतींचे सदस्य आणि 16 पंचायत समित्यांचे […]

यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणूक : महाविकास आघाडीसमोर भाजपचं तगडं आव्हान
Follow us on

यवतमाळ : यवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी आज (शुक्रवार 31 जानेवारी) मतदान होत आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर भाजपकडून सुमीत बाजोरीया यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे यवतमाळची निवडणूक चुरशीची आणि तितकीच प्रतिष्ठेची (Yawatmal Vidhan Parishad Bypoll Voting) होणार आहे.

जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरपरिषदा, नगर पंचायतींचे सदस्य आणि 16 पंचायत समित्यांचे सभापती मिळून 489 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 4 फेब्रुवारीला मतमोजणीनंतर निवडणुकीचा निकाल हाती येईल.

चार अपक्षांनीही यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती, परंतु त्यांनी माघाक घेतल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये थेट लढत पहायला मिळणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे त्यांचं पारडं जड आहे.

यवतमाळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतून शिवसेनेचे तानाजी सावंत विधानपरिषदेचे सदस्य होते. आता ते उस्मानाबादमधून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्या जागी माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. चतुर्वेदींनी अवघ्या सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता.

कोण आहेत दुष्यंत चतुर्वेदी

  • दुष्यंत चतुर्वेदी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता
  • दुष्यंत चतुर्वेदी हे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे चिरंजीव आहेत
  • सतीष चतुर्वेदी हे विदर्भाच्या राजकारणातील मोठं नाव आहे. ते 25 वर्ष आमदार आणि 10 वर्ष कॅबिनेट मंत्री होते
  • दुष्यंत चतुर्वेदी सध्या त्यांच्या शैक्षणिक संस्थांचं काम पाहण्यासोबतच सामाजिक कामांमध्येही व्यस्त असतात.
  • वडील सतीष चतुर्वेदी यांच्याकडूनच त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं.
  • विदर्भात सतीष चतुर्वेदी यांचा मोठा जनसंपर्क आहे.

कागदावर आकडे महाविकास आघाडीच्या बाजूने असले तरीही स्थानिक मुद्द्यावर विजयाचा विश्वास भाजप उमेदवार सुमीत बाजोरीया यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना व्यक्त केला. पोटनिवडणुकीत (Yawatmal Vidhan Parishad Bypoll Voting ) भाजप आणि महाविकास आघाडीसमोर आपापले मतदार राखण्याचं आव्हान आहे.

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेतील पक्षीय बलाबल

  • भाजप – 147
  • शिवसेना – 97
  • काँग्रेस – 92
  • राष्ट्रवादी काँग्रेस- 51
  • प्रहार – 18
  • इतर – 72
  • बसपा – 4
  • एमआयएम – 8
  • एकूण – 489

संबंधित बातम्या :

यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचा तगडा उमेदवार, शिवसेनेला मोठा फटका?

Yawatmal Vidhan Parishad Bypoll Voting