बोहल्यावर चढण्यापूर्वी बाशिंग बांधून लोकसभेचा अर्ज भरला, दानवेंना आव्हान

जालना: सध्या राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. त्याची प्रचिती सर्वत्र येत आहे. जालन्यातील एका बहाद्दराने डोक्याला बाशिंग बांधून थेट लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला. लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी लोकसभेचे उमेदवारी अर्ज भरला. सुदाम इंगोले असं या उमेदवाराचं नाव आहे. सुदाम इंगोले यांनी अर्ज भरुनच लग्नाच्या मंडपात प्रवेश केला. जालना लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अपक्ष अर्ज दाखल […]

बोहल्यावर चढण्यापूर्वी बाशिंग बांधून लोकसभेचा अर्ज भरला, दानवेंना आव्हान
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

जालना: सध्या राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. त्याची प्रचिती सर्वत्र येत आहे. जालन्यातील एका बहाद्दराने डोक्याला बाशिंग बांधून थेट लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला. लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी लोकसभेचे उमेदवारी अर्ज भरला.

सुदाम इंगोले असं या उमेदवाराचं नाव आहे. सुदाम इंगोले यांनी अर्ज भरुनच लग्नाच्या मंडपात प्रवेश केला. जालना लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.

सुदाम इंगोले जालना तालुक्यातील धारकल्यान येथील रहिवासी आहेत. बदनापूर तालुक्यातील उज्जेनपुरी इथे आज संध्याकाळी त्यांचा विवाह होत आहे. मात्र त्यापूर्वी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

जालना लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रावसाहेब दानवे मैदानात आहेत. तर काँग्रेसकडून विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सुदाम इंगोले यांनी अपक्ष अर्ज भरला असला तरी आपण बच्चू कडू यांच्या विचाराचे आहोत असं त्यांनी सांगितलं.