Corona : कोरोना कसा पसरतो? अमोल कोल्हेंनी कोरोनाचा गुणाकार समजावून सांगितला

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी या कोरोना विषाणूचा गुणाकार समजावून सांगितला आहे.

Corona : कोरोना कसा पसरतो? अमोल कोल्हेंनी कोरोनाचा गुणाकार समजावून सांगितला

पुणे : राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची (Corona Virus Infection) संख्या वाढत चालली आहे. पुण्याबरोबरच ग्रामीण भागातही नव्यानं रुग्ण आढळून येत आहेत. जुन्नर तालुक्यातील एका रुग्णालाही कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णांची संख्या (Corona Virus Infection) सातत्यानं वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी या विषाणूचा गुणाकार समजवून सांगितला आहे.

लॉकडाऊनच्या काळात एक व्यक्ती नियमांचे उल्लंघन करुन मुंबईहून जुन्नरला आली. 17 मार्चला ही व्यक्ती अनेकांना भेटली. त्यानंतर मुंबईहून आलेल्या या व्यक्तीला 27-28 मार्चला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचं आढळून आलं.

या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या एका मुंबईच्या आणि दुसऱ्या डिंगोरेच्या नागरिकालाही कोरोना विषाणूची लागण झाली. डिंगोरेच्या नागरिकाला 31 तारखेला लक्षणं (Corona Virus Infection) आढळली. म्हणजेच 17 मार्च ते 30 मार्च या कालावधीत तो अनेकांना भेटला असेल. म्हणजेच या रुग्णाच्या शरीरात कोरोना विषाणू हा 14 दिवस होता.

म्हणजेच 30 मार्चला तो ज्या कोणाच्या संपर्कात आला असेल, त्याला 13 एप्रिलनंतर लक्षणं दिसून येतील. अशा पद्धतीने कोरोणाचा गुणाकार होत असल्याने सर्वांनी दक्षता घेणे गरजेचं असल्याचं आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी केलं.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 300 पार

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 300 पार गेला (Corona Patient In Maharashtra) आहे. आज (31 मार्च) दिवसभरात नव्या 72 रुग्णांची नोंद झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे सर्वाधिक 59 रुग्ण, 2 रुग्ण पुण्याचे, 3 अहमदनगरचे, 2 ठाण्याचे, 2 कल्याण-डोंबिवलीचे, 2 नवी मुंबईचे तर 2 वसई विरारचे आहेत. यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ही 151 वर पोहोचली आहे. तर राज्यातील संख्या ही 302 वर पोहोचली आहे.

Corona Virus Infection

संबंधित बातम्या :

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *