पुण्यातील झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय संपावर

ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवणारी फुड कंपनी झोमॅटोची पुण्यातील सेवा विस्कळीत झाली (Pune zomato delivery boys on strike) आहे.

पुण्यातील झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय संपावर

पुणे : ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवणारी फुड कंपनी झोमॅटोची पुण्यातील सेवा विस्कळीत झाली (Pune zomato delivery boys on strike) आहे. विविध मागण्यांसाठी झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय संपावर गेले आहेत. त्यामुळे ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्या पुणेकरांचे यामुळे हाल होणार आहेत.

विविध मागण्यांसाठी पुण्यातील अडीच ते तीन हजार डिलिव्हरी बॉईज संपावर जाणार आहेत. झोमॅटो कंपनी डिलिव्हरी बॉईजच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉईजने घेतली (Pune zomato delivery boys on strike) आहे.

काय आहेत मागण्या?

  • सर्व डिलिव्हरी बॉईजला समान ऑर्डर मिळाव्यात
  • पीक अप ३ किमी आणि ड्रॉप ७ किमी असावा
  • जुन्या मात्र कमी केलेल्या मुलांना पुन्हा कामावर घ्यावे
  • रायडरसोबत कुटुंबियांना इन्शुरन्स मिळावा
  • इंसेंटिव्ह सर्वांना समान मिळावा

या सर्व मागण्यांसाठी झोमॅटोचे डिलिव्हरी बॉईज संपावर जाणार आहेत. हा संप बेमुदत असल्याचे सांगितले जात आहे. या संपामुळे पुणेकरांचे हाल होणार (Pune zomato delivery boys on strike) आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *