
2026 या नव्या वर्षासाठी अनेक संकल्प अनेकांनी केले आहेत. त्यानुसार प्रत्येक वागण्याचा प्रयत्न निदान एक महिना तरी करेल. पण एखाद्याने चंग बांधलाच तर हा संकल्प नित्याचाच होईल. शेवटी ते तुमच्या धैर्यावर अवलंबून आहे. असं असताना दुसरीकडे संकल्प तर करू पण ग्रहांची साथ मिळणार का? असाही एक वर्ग आहे. पुढच्या वर्षात कोणता ग्रह आपल्याला साथ देईल याची गणितं अनेक जण बांधत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार गणित मांडून बघितली जात आहेत. तुम्हाला असंच वाटत असेल तर एक गणित तुमच्या राशीसाठी जुळून येते का? ते बघा. पुढच्या वर्षात गुरू आणि शनिची युती सर्वात महत्त्वाची ठरणार असल्याचं ज्योतिष सांगत आहेत. गुरू हा ग्रह सिंह राशीत, तर शनि मीन राशीत असणार आहे. तसं पाहिलं तर सिंह राशीच्या लोकांना शनिची अडीचकी सुरु आहे. तर मीन राशीच्या जातकांना साडेसाती… पण या दोन्ही ग्रहांच्या स्थितीमुळे एक योग तयार होत आहे. त्याचा फायदा काही राशींना होईल, असं ज्योतिषशास्त्र सांगतं..
कर्क : शनि आणि गुरूची स्थिती या राशीच्या जातकांना लाभदायी ठरणार आहे. या काळात दोन्ही ग्रहांमुळे नशिब जोरदार साथ देणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील. काही गोष्टी तुमच्या बाजूने झुकलेल्या दिसतील. तसेच हातात घेतलेली कामंही तुम्ही झटपट पूर्ण कराल. त्यामुळे कामाचा उरक पटापट होईल. धार्मिक स्थळी जाण्याचा योग जुळून येईल. देशविदेशातील यात्रा घडू शकतात.
मिथुन : या राशीच्या जातकांना शनि आणि गुरूचा लाभ मिळणार आहे. या कालावधीत नोकरी धंद्यात अपेक्षित यश मिळेल. प्रगतीसह नवे आर्थिक स्रोत खुले होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कामातून फुरसत मिळणं कठीण होईल. या काळात तब्येतीकडे लक्ष ठेवा. नोकरी करणाऱ्या जातकांना या काळात सकारात्मक बदल दिसतील. केलेल्या कामात यश मिळताना दिसेल. उद्योग धंद्यात धनलाभ होऊ शकतो.
कुंभ : गुरू आणि शनिचा योग या राशीच्या जातकांसाठी सकारात्मक सिद्ध होऊ शकतो. साडेसातीचा शेवटचा टप्पा आहे. त्यामुळे शनि महाराज जातांना काही तरी भक्कम देऊन जातील, असं ज्योतिष सांगतात. पण त्यासाठी मेहनत आणि काटेकोरपणा पाळणं खूपच गरजेचं आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. भागीदारीच्या धंद्यात चांगलं यश मिळू शकते. आर्थिक सुधारणा तुम्हाला या काळात दिसून येईल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)