
गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी (12 जून 2025) झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. या अपघातात 265 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. दरम्यान, ज्योतिषी गौरव पुरोहित यांनी पाच वर्षांपूर्वी केलेले भाकीत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना गौरव पुरोहित म्हणाले की, ते गेल्या पाच वर्षांपासून अशा प्रकारच्या भविष्यवाण्या करत आहेत. ते देश आणि जगातील राजकारण, अर्थव्यवस्था, खेळ, आणि लष्कर यासारख्या विषयांवर भविष्यवाणी करतात. त्यांनी सात जूननंतर मोठ्या विमान अपघाताची शक्यता वर्तवली होती, जी आता खरी ठरल्याचे दिसते. याशिवाय, त्यांनी एका मोठ्या नेत्याच्या निधनाचीही भविष्यवाणी केली होती.
वाचा: अहमदाबाद विमान अपघातात खासदार सुनील तटकरे यांचे नातेवाईक
या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यासह 241 प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. फक्त एक प्रवासी, ब्रिटिश नागरिक विश्वासकुमार रामेश, हा या अपघातातून वाचला आहे. विमान अहमदाबाद विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळासाठी उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत कोसळले आणि एका निवासी भागात जाऊन आदळले.
सध्या या अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. एक ब्लॅक बॉक्स सापडला असून, दुसऱ्याचा शोध सुरू आहे. गौरव पुरोहित यांच्या भविष्यवाणीमुळे सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा होत आहे. काहींनी त्यांच्या अचूकतेचे कौतुक केले, तर काहींनी यावर संशय व्यक्त केला आहे.