12 वर्षानंतर शक्तिशाली गजकेसरी योग, गुरु-चंद्रामुळे या राशींचं अडीच दिवसात खुलणार नशि‍बाचं टाळं!

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीवरून रोज काही ना काही घडत असतं. सध्या ग्रहांची स्थिती आणि आसपास घडणाऱ्या तणावपूर्ण घडामोडी पाहता एक दिलासादायक बातमी आहे. गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे एक शक्तिशाली गजकेसरी योग तयार होणार आहे. यामुळे काही राशींच्या नशि‍बाचं टाळं खुलणार आहे.

12 वर्षानंतर शक्तिशाली गजकेसरी योग, गुरु-चंद्रामुळे या राशींचं अडीच दिवसात खुलणार नशि‍बाचं टाळं!
गजकेसरी योग
| Updated on: May 02, 2025 | 5:43 PM

ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचा एक गोचर कालावधी ठरलेला आहे. ग्रहांची स्थिती प्रत्येक राशीत वेगवेगळी असते. त्यानुसार फळं आणि भाकीत वर्तवलं जातं. शनि ग्रहाला एका राशीत परत येण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी लागतो. तर गुरु ग्रह 13 महिन्यांनी राशी बदल करतो. गुरु ग्रह येत्या काही दिवसात मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. पण यंदा गुरुचा गोचराचा वेग अधिक असल्याने मिथुन राशीत फक्त 5 महिने राहणार आहे. त्यानंतर कर्क राशीत प्रवेश करेल. त्यामुळे या पाच महिन्यांच्या कालावधीत बरीच उलथापालथ होणार आहे. मे महिन्याच्या शेवटी चंद्र ग्रह मिथुन राशीत येताच शक्तिशाली गजकेसरी योग तयार होार आहे. पंचांगानुसार, देवगुरु बृहस्पती 14 मे रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 28 मे रोजी चंद्र दुपारी 1 वाजून 36 मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करेल. यामुळे अडीच दिवस गुरु आणि चंद्राची युती होईल. ही युती 54 तास म्हणजेच 30 मे पर्यंत असेल.

या तीन राशींना मिळणार फळ

वृषभ : या राशीच्या दुसऱ्या स्थानात गजकेसरी योग तयार होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांचं नशि‍बाचं दार खुलं होणार आहे. यशासोबत धनलाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती या कालावधीत चांगली राहील. कौटुंबिक पातळीवर आनंदाचं वातावरण राहील. प्रत्येक कामात थोड्या मेहनतीने यश मिळेल. त्यामुळे पैसा खेळता राहील. या कालावधीत केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरू शकते. उधारीने दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ : या राशीच्या पाचव्या स्थानात गजकेसरी योग तयार होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अडचणी चुटकीसरशी पूर्ण होतील. करिअरमध्ये मोठी उंची गाठाल. विदेशात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या जातकांना चांगल्या ऑफर मिळू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील. एकंदरीत जीवनातील काही किचकट अडचणी दूर होतील.

वृश्चिक : या राशीच्या अष्टम स्थानात गुरु आणि चंद्राची युती होत आहे. या राशीच्या जातकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ असेल. काम करत असलेल्या ठिकाणी पदोन्नती किंवा वेतनवाढ होऊ शकेत. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. अध्यात्माकडे कल वाढेल. तसेच धार्मिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)