Astrology: ‘या’ राशींच्या मुली आपल्या जोडीदाराशी असतात एकनिष्ठ

कुठल्याही नात्यामध्ये विश्वास हाच त्याचा पाया असतो. लग्न असो किंवा प्रेम संबंध यामध्ये आपल्या जोडीराशी एकनिष्ठ असणे बंधनकारक असते. एकनिष्ठता (loyal) या एका नाजूक धाग्यावरच नात्याचे अस्तित्त्व टिकून असते. आजच्या आधुनिक युगात मुला-मुलींचे एकमेकांकडे आकर्षित होणे आणि प्रेमात पडणे सामान्य झाले आहे. काही परिस्थितींमध्ये, प्रकरण इथपर्यंत पोहोचते की, कित्तेक जण जोडीदारासाठी ( partner) आपला जीव […]

Astrology: 'या' राशींच्या मुली आपल्या जोडीदाराशी असतात एकनिष्ठ
नितीश गाडगे

|

Jun 26, 2022 | 10:26 AM

कुठल्याही नात्यामध्ये विश्वास हाच त्याचा पाया असतो. लग्न असो किंवा प्रेम संबंध यामध्ये आपल्या जोडीराशी एकनिष्ठ असणे बंधनकारक असते. एकनिष्ठता (loyal) या एका नाजूक धाग्यावरच नात्याचे अस्तित्त्व टिकून असते. आजच्या आधुनिक युगात मुला-मुलींचे एकमेकांकडे आकर्षित होणे आणि प्रेमात पडणे सामान्य झाले आहे. काही परिस्थितींमध्ये, प्रकरण इथपर्यंत पोहोचते की, कित्तेक जण जोडीदारासाठी ( partner) आपला जीव द्यायला देखील मागेपुढे पाहात नाहीत. तर अनेक वेळा एखाद्याच्या घरातील लोकांनी दोन व्यक्तींचे प्रेम स्वीकारले नाही, तर लोक वेगळ्या वाटेवर देखील जातात. यावेळेला ते आपलं चांगलं वाईट कशाचाही विचार करत नाहीत. तर दुसरीकडे एकनिष्ठतेअभावी नातं फार काळ टिकू शकत नाही. अशा स्थितीत ज्योतिषशास्त्रात काही राशींचाही (zodiac sign) उल्लेख आहे, या राशीच्या मुली नात्यामध्ये आपल्या जोडीदारांशी एकनिष्ठ असतात.

हे सुद्धा वाचा

  1. मिथुन- ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीच्या मुली प्रेमाच्या बाबतीत फार गंभीर असतात. मिथुन राशीच्या मुली, ज्यांच्याशी  एकदा मनापासून जोडतात, त्यांच्याशी एकनिष्ठ. त्यांना  त्यांच्या प्रेम जीवनात रोमान्स आणि प्रेम टिकवून ठेवण्यासाठी काहीतरी नवीन आणि रोमांचक करायला आवडते. या राशीच्या मुली आपल्या जोडीदाराशी काहीच लपवत नाही.
  2.   सिंह- सिंह राशीच्या मुली रोमँटिक स्वभावाच्या मानल्या जातात. प्रेमाच्या बाबतीत सिंह राशीच्या मुली आपल्या जोडीदारासोबत कोणताही संकोच न करता मनापासून बोलतात. जोडीदाराच्या आनंदात त्या स्वतःचा आनंद मानतात. या स्वभावामुळे त्यांच्या नात्यात बंध दृढ राहतात. आपल्या जोडीदाशी त्या अत्यंत प्रामाणिक असतात. त्यामुळे जोडीदाराकडूनही त्या तीच अपेक्षा ठेवतात.
  3. धनु- या राशीच्या मुली मनाने निर्मळ असतात. त्या नात्याच्या बाबतीत अत्यंत पारदर्शी असतात आणि कोणत्याही प्रकारची फसवणूक करत नाहीत. ज्योतिष शास्त्रानुसार जो मुलगा तिच्या प्रेमात पडतो तो खूप भाग्यवान असतो. कारण या मुली स्वतःच्या आधी आपल्या जोडीदाराचा  विचार करतात. आपल्या जोदीरासोबत त्या कधीच विश्वासघात करीत नाही. या राशीच्या मुली आपल्या जोडीदाराच्या पैशांवर नाही तर त्यांच्या गुणांवर प्रेम करतात.
  4. मकर- मकर राशीच्या मुली आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक लहान-मोठ्या आनंदाची, आवडी-निवडी इत्यादींची योग्य काळजी घेतात. प्रेम मिळवण्यासाठी आणि नात्यात ताजेपणा टिकवण्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार असतात. अशा परिस्थितीत जर तुमचा जोडीदार मकर राशीचा असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. मकर राशीच्या मुली आपल्या जोडीदाराच्या संकट काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. नात्यातल्या एकनिष्ठतेची त्यांना जाण असते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें