AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: आजचे राशी भविष्य, ‘या’ राशीच्या लोकांचे अडकलेली कामं होणार पूर्ण

आजचे राशी भविष्य. जाणून घेऊया बारा राशींसाठी कसा जाणार आजचा दिवस. कोणाची अडकलेली काम होणार पूर्ण

Astrology: आजचे राशी भविष्य, 'या' राशीच्या लोकांचे अडकलेली कामं होणार पूर्ण
आजचे राशी भविष्य Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 22, 2022 | 7:53 AM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- नकारात्मक परिस्थितीनं डगमगून जाऊ नका. एखादा वाईट विचार मनात घर करु लागल्यास, त्यादृष्टीनं ध्यानधारणा करा. कपड्यांच्या व्यवसायात आज तुम्हाला फायदा होणार आहे.
  2. वृषभ- अथक परिश्रमांनंतरही तुम्हाला यश मिळत नसेल, तर आपण कुठे कमी पडतोय याचं आत्मपरीक्षण करा. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी परिस्थिती पूरक आहे. सतर्क राहा.
  3.  मिथुन- आज मोठ्यांचा सल्ला तुमच्या आयुष्याला कलाटणी देणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. घरगुती खर्च वाढले तरीही आर्थिक पाठबळ असेल, त्यामुळं चणचण भासणार नाही.
  4. कर्क-  सकारात्मकतेनं दिवस परिपूर्ण असेल. अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत. नव्या नात्यांना बहर येणार आहे. विश्वासार्ह मंडळींची मनं जिंकाल.
  5.  सिंह – तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित एखाद्या मोठ्या व्यक्तीला भेटण्याची संधी मिळणार आहे. सावध राहा. जोडीदारासोबत असं एखादं काम कराल, ज्याचं कुटुंबीयांना कौतुक वाटेल.
  6. कन्या- खरेदी करताना काही गोष्टी ध्यानात ठेवा. उत्साहाच्या भरात वायफळ खर्च नको. आरोग्याची काळजी घ्या. मसालेदार अन्नपदार्थ टाळा.
  7.  तुळ- घरात एखादं नवं उपकरण खरेदी कराल. विद्यार्थ्यांनी नको त्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. बेजबाबदारपणा अंगावर येऊ शकतो, सावध राहा.
  8. वृश्चिक- नोकरीच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी आहे प्रचंड मेहनतीनं ते साध्य होणार आहे. एखादी अडचण येईल, पण ती वायुवेगाने निघूनही जाईल. देवाणघेवाणी करताना सतर्क राहा.
  9. धनु- ग्रह तुम्हाला चांगला परिणाम देणार आहेत. एखादी शुभसूचना मिळणार आहे. बेकायदेशीर कामांकडे तुमची वाट वळवू नका.
  10. मकर- आज तुम्हाला मोठ्या व्यक्तीच्या ओळखीचा फायदा होण्याची शक्यता आहे.  इतरांना आदर करणं शिका. आर्थिक परिस्थिती सुधारेल. गरीब कुटुंबाची मदत करा. आहाराच्या सवयी बदला.
  11. कुंभ- आज ज्यांचा वाढदिवस वगैरे आहे त्यांना भेटवस्तू मिळणार आहेत. वादांवर तोडगा निघेल. सर्वांमध्ये तुमच्या स्वभावाची चर्चा असेल, तोच स्वभाव तुम्हाला मोठं करणार आहे.
  12. मीन- व्यवसायात लाभ होणार आहे. खाण्यापिण्याच्या वाईट सवयी सोडा. मित्रांना भेटण्याचा योग आहे. रक्षाबंधनासाठी घरात आनंदी वातावरण असेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.