AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांचे अडकलेले काम होणार पूर्ण

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांची अडकलेली कामं होणार पूर्ण

आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांचे अडकलेले काम होणार पूर्ण
आजचे राशी भविष्य Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 24, 2022 | 6:46 AM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष आजचा सोमवार कोणत्याही नवीन उपक्रमासाठी उत्तम काळ आहे. तुम्ही बहुतांश उपक्रम यशस्वीपणे हाताळण्यास सक्षम असणार आहात.
  2. वृषभ- सोमवार तुमच्या कौटुंबिक जीवनात अस्थिरता येऊ शक्यता आहे. तुमचं तुमच्या पालकांशी काही वैचारिक मतभेद असू शकतात. प्रेमसंबंधांसाठी काळ शुभ आहे.
  3. मिथुन- या काळात तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न असाल. व्यवसायाचा विस्तारही होऊ शकतो. तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे.
  4. कर्क- आज तुमची चांगली कामगिरी इतरांना प्रभावित करेल. तुम्ही तुमच्या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त काही करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला त्यात यश मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस निराशाजनक असू शकतो.
  5. सिंह- ज्येष्ठ नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा भावनिक सहभाग आणि लांबचा प्रवास टाळावा. कुटुंबातील सदस्यांमधील अस्वस्थता तुमच्यासाठी चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.
  6. कन्या- आज तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या खूप यशस्वी व्हाल. तुम्हाला आरोग्य चांगलं राहणार आहे. शिवाय तुमचा आत्मविश्वासही खूप वाढेल.
  7. तूळ- आज  तुम्ही तुमच्या संपर्कांमुळे व्यवसाय आणि व्यावसायिक संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल.
  8. वृश्चिक- या सोमवारी तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही गोंधळलेल्या स्थितीत असाल आणि ही परिस्थिती तुम्हाला वेळेवर काम पूर्ण करण्यापासून रोखू शकते.
  9. धनू- आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांना तुमचं मन सांगू शकाल. यावेळी तुमच्या युक्तीने तुम्हाला कुटुंबियांकडून मदत मिळू शकेल.
  10. मकर- आजच्या दिवशी तुम्ही थोडे चिंतेत राहण्याची शक्यता आहे. तुम्ही अनावश्यक गुंतागुंतीमध्ये अडकू शकता. आर्थिक समस्या सोडवण्यासही थोडा वेळ लागू शकतो.
  11. कुंभ-  या सोमवारी तुमच्यापैकी काहींना आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर प्रवास होऊ शकतो. कौटुंबिक वातावरणातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे कुटुंबातील सदस्य तुमच्या यशाचा पूर्ण आनंद घेऊ शकणार नाहीत.
  12. मीन- या सोमवारी नशीब चांगलं असून तुम्ही सर्व कामं उत्तम कराल. नोकरदार लोकांना कोणतंही विशेष काम यश मिळवून देऊ शकतं. परदेशी संपर्क असलेल्या लोकांना अचानक लाभ होईल आणि प्रवासही होऊ शकतो.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.