Astrology: ‘या’ राशीचे लोक असतात प्रचंड रागीट; पैसा, नाते, मान-सम्मान सगळं गमावतात

| Updated on: Jul 01, 2022 | 10:06 AM

काम, क्रोध, मोह, माया आणि मत्सर हे पाच दोष माणसाला नष्ट करतात असे हिंदू धर्मात सांगितले आहे. त्यापैकी क्रोध (angry) म्हणजेच राग हा आपण अनेकांमध्ये. घर असो किंवा ऑफिस रागीट स्वभावाची व्यक्ती शांत वातावरण तणावपूर्ण आणि नकारात्मक करते. याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकानेच घेतला असेल.  प्रत्येक व्यक्तीचा स्वत:चा एक स्वभाव असतो. त्या राशीनुसार (zodiac sign people) […]

Astrology: या राशीचे लोक असतात प्रचंड रागीट; पैसा, नाते, मान-सम्मान सगळं गमावतात
Follow us on

काम, क्रोध, मोह, माया आणि मत्सर हे पाच दोष माणसाला नष्ट करतात असे हिंदू धर्मात सांगितले आहे. त्यापैकी क्रोध (angry) म्हणजेच राग हा आपण अनेकांमध्ये. घर असो किंवा ऑफिस रागीट स्वभावाची व्यक्ती शांत वातावरण तणावपूर्ण आणि नकारात्मक करते. याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकानेच घेतला असेल.  प्रत्येक व्यक्तीचा स्वत:चा एक स्वभाव असतो. त्या राशीनुसार (zodiac sign people) त्या व्यक्तीचा स्वभाव, भविष्य आणि व्यक्तिमत्व ठरत असते. काही राशींच्या व्यक्ती खूप शांत असतात तर काही खूप रागीटअसतात. प्रत्येकाची आवड-निवड ही वेगळी असते. ज्योतिषशास्त्रात अशा 4 राशींबाबत सांगितले आहे ज्यांना खूप राग येतो. तसेच छोट्या-छोट्या गोष्टींवरून हे लोक चिडतात. त्यांचे रागावर नियंत्रण  नसते. या लोकांपासून जरा सजगच राहिले पाहिजे. जाणून घेऊया या राशींबद्दल.

  1. मेष रास- ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. याच्या प्रभावामुळे या व्यक्तींचा स्वभावही गरम असतो. तशा तर या व्यक्ती मस्त बिलंदर असतात मात्र जेव्हा यांना राग येतो तेव्हा त्यांना शांत करणे कठीण होते. या व्यक्ती कोणत्याही गोष्टी आपल्या मनाला लावून घेतात. तसेच रागात आपले नियंत्रण गमावतात. या राशीच्या लोकांचे फार कमी लोकांसोबत पटते.
  2. वृषभ रास- वृषभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव अतिशय तापट असतो. यांना चुकीची गोष्ट अजिबात आवडत नाही. रागामध्ये ते आपल्या मनातील खदखद बाहेर काढतात. बोलताना काहीही बोलून जातात. त्यांचे स्वत:वरील नियंत्रण सुटते आणि मनात येईल ते  बोलून मोकळे होतात. अनेकदा या चुकीमुळे त्याचे स्वत:चेच नुकसान होते. इतरांच्या मनात त्यांच्याविषयी द्वेष निर्माण होतो.
  3. सिंह रास- सिंह राशीच्या व्यक्ती अतिशय रागीट असतात. जर या लोकांना एकदा राग आला तर त्या कोणाचेच ऐकत नाहीत. या व्यक्ती थोडंस कोणी बोललं तरी मनाला लावून घेतात. रागामध्ये त्यांना चांगले काय वाईट काय हे कळत नाही. अनेकदा स्वत:चेच त्यांचे नुकसान होते. त्यांच्या रागीट स्वभावामुळे अनेकांसोबतचे नाते खराब होते आणि याचा दोष ते इतर लोकांनाच देतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

हे सुद्धा वाचा