Astrology: ‘या’ राशीचे लोकं असतात अत्यंत अहंकारी; चांगले बोलणे त्यांना कधीच जमत नाही

प्रत्येक राशींमध्ये (Zodiac) जन्मलेल्या लोकांचा स्वभाव वेगवेगळा असतो. जोतिष्यशास्त्रात (Astrology) याबद्दल सखोल माहिती दिली गेली आहे.  प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. काहींची काही खास वैशिष्ट्ये असतात तर काहींची वेगळीच हौस असते. ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या राशीच्या आधारे भविष्यात ती व्यक्ती कसे काम करेल हे सांगितले जाऊ शकते. तसेच त्याची आर्थिक स्थिती, यश इत्यादीबद्दल देखील अंदाज लावला जाऊ शकतो. […]

Astrology: 'या' राशीचे लोकं असतात अत्यंत अहंकारी; चांगले बोलणे त्यांना कधीच जमत नाही
नितीश गाडगे

|

Jun 29, 2022 | 8:45 AM

प्रत्येक राशींमध्ये (Zodiac) जन्मलेल्या लोकांचा स्वभाव वेगवेगळा असतो. जोतिष्यशास्त्रात (Astrology) याबद्दल सखोल माहिती दिली गेली आहे.  प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. काहींची काही खास वैशिष्ट्ये असतात तर काहींची वेगळीच हौस असते. ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या राशीच्या आधारे भविष्यात ती व्यक्ती कसे काम करेल हे सांगितले जाऊ शकते. तसेच त्याची आर्थिक स्थिती, यश इत्यादीबद्दल देखील अंदाज लावला जाऊ शकतो. आज आपण अशा लोकांबद्दल जाणून घेणार आहोत जे स्वभावाने खूप अहंकारी (Egoistic) असतात. एवढेच नाही तर या लोकांना इतरांशी नीट बोलणेही ( arrogant) आवडत नाही. असे बरेच लोकं आपल्या अवती भवती असतात. काही आपले त्यांच्याशी भांडण होते तर कधी आपण त्यांना टाळण्याचा प्रयत्न करतो.

  1. मेष राशी – मेष या राशीच्या लोकांमध्ये अती आत्मविश्वास असतो. कधीकधी ते काही विशिष्ट परिस्थितींमध्ये खूप आत्मविश्वास बाळगतात. तसेच इतरांकडून जर चूक झाली तर ते दाखवून देतात आणि इतरांसमोर त्यांच्या नकारात्मक गोष्टी अजिबात स्वीकारत नाहीत. ते स्वभावाने खूप अहंकारी मानले जातात. ते स्वत:ला खूप हुशार समजतात. ते स्पष्ट वक्ते असतात.
  2. सिंह राशी – ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीचे लोक खूप गर्विष्ठ स्वभावाचे असतात. ते सतत काही ना काही ढोंग करतात. प्रत्येक परिस्थितीत स्वतःला वेगळे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. एवढेच नाही तर ते स्वत:ला मोठे असल्याचा गर्व बाळगतात. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांना भेटणाऱ्यांनाही त्रास होतो. एवढेच नाही तर त्यांच्याशी राहणाऱ्या मंडळीला देखील ते दुजाभावाची वागणूक देतात. या राशीच्या लोकांना त्यांच्या बोलण्याचा आणि अहंकाराचा यत्किंचितही पश्चाताप होत नाही.
  3. वृश्चिक राशी – ही लोक स्वभावाने खूप अहंकारी असतात. चालणे आणि इतरांपेक्षा वेगळे दिसणे हा त्यांच्या प्रवृत्तीचा भाग आहे. ते स्वतःला वेगळे दिसण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात. त्यांना कोणाशीही नीट बोलणे आवडत नाही. आपल्या फटकळ बोलण्यामुळे या राशीचे लोकं बऱ्याचदा इतरांची मनं दुखावतात.
  4. मकर राशी – ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे लोक गर्दीत स्वतःला वेगळे दिसण्यासाठी खूप प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत त्यांचा दिखावा स्पष्टपणे दिसून येतो आणि ते इतरांपासून तोडले जाऊ लागतात. हे लोक स्वतःला सर्वोत्कृष्ट दाखवण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. स्वतःचे म्हणणे खरं करण्यासाठी ते अहंकाराला पेटून उठतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें