Astrology: असे असतात वृश्चिक राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्त्व, या गोष्टी बनवतात त्यांना इतरांपेक्षा विशेष

हे लोक प्रबळ इच्छाशक्तीचे असतात. या राशीचे लोक आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे चांगले जाणतात. एकदा का एखाद्या गोष्टीचा हट्ट धरला की, मग ते पूर्ण करूनच ते दम घेतात. बऱ्याचदा त्यांचा स्वभाव रागीट असतो.  त्यांना कुणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही.

Astrology: असे असतात वृश्चिक राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्त्व, या गोष्टी बनवतात त्यांना इतरांपेक्षा विशेष
वृश्चिक राशी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 5:50 PM

वृश्चिक राशीचा (Scorpio Zodiac) स्वामी ग्रह मंगळ आहे त्यामुळे  या राशीच्या जातकांवर मंगळाची विशेष कृपा असते. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला धैर्य आणि उर्जेचा कारक मानले जाते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा ग्रह बलवान असतो तो शक्तिशाली, प्रभावशाली, धैर्यवान आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असतो. अशा लोकांचे व्यक्तिमत्व (Personality) खूप मजबूत असते. मंगळामुळेच या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व खूप प्रभावशाली असते. हे लोक प्रबळ इच्छाशक्तीचे असतात. या राशीचे लोक आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे चांगले जाणतात. एकदा का एखाद्या गोष्टीचा हट्ट धरला की, मग ते पूर्ण करूनच ते दम घेतात. बऱ्याचदा त्यांचा स्वभाव रागीट असतो.  त्यांना कुणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही. वृश्चिक राशीचे जातक प्रचंड स्वाभिमानी असतात.

संघर्षाला घाबरत नाही

वृश्चिक राशीचे जातक दृढ इच्छाशक्ती आणि दृढनिश्चयी असतात. एकदा त्यांनी जे काम करायचे ठरवले ते पूर्ण करूनच  श्वास घेतात. त्यांचे जीवन संघर्षांनी भरलेले असते पण ते घाबरत नाहीत. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला ते सामोरे जातात. वृश्चिक राशीचे जातक बुद्धिमान असतात. तसेच त्यांची कल्पनाशक्ती खूप चांगली असते. ते कठोर परिश्रम करण्यास सैदव तयार असतात. ते सैन्य, पोलीस, उच्च प्रशासकीय अधिकारी, गणितज्ञ, पत्रकार, लेखक, सिनेमा इत्यादी क्षेत्रात यशस्वी होतात.

या अक्षरापासून सुरु होते नाव

ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू पासून सुरु होत असेल त्यांची राशी वृश्चिक असते. ही राशीचक्रातील आठवी राशी आहे. या राशीचे चिन्ह विंचू असून ही जलतत्त्वाची राशी आहे. या राशीचा स्वामी मंगळ आहे.

हे सुद्धा वाचा
  1.  वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये इतरांना आकर्षित करण्याची क्षमता असते. या राशीच्या व्यक्ती बहाद्दूर तसेच भावुकही असतात.
  2.  या राशीच्या व्यक्तींना मूर्ख बनवणे सहजसोपे नसते.
  3.  या राशीच्या व्यक्तींना धोका देणे शक्य होत नाही. या व्यक्ती नेहमीच योग्य सल्ला देण्यात विश्वास ठेवतात.
  4.  या राशीच्या व्यक्ती स्वत:चे विचार फारसे बोलून न दाखवणाऱ्या तसेच इतरांच्या विचारांना विरोध करणाऱ्या असतात.
  5.  या व्यक्ती सर्वांमध्ये मिसळू शकत नाहीत.
  6.  या राशीच्या महिला बुद्धिमान आणि भावुक असतात. यांची इच्छाशक्ती प्रबळ असते तसेच स्वभावाने हट्टी व अतिमहत्त्वाकांक्षी असतात. थोडीफार स्वार्थी प्रवृत्तीही असते.
  7.  स्वतंत्रपणे निर्णय घेणे यांची सवय असते. नोकरीमध्ये नेहमी स्वत:चे वर्चस्व कायम ठेवतात.
  8.  लोकांच्या चुका आणि वाईट गोष्टी लक्षात ठेवतात आणि योग्य वेळ आल्यावर उत्तरही देतात. यांची वाणी कटू आणि क्रोध जास्त असतो परंतु मन साफ असते. इतरांमध्ये दोष शोधण्याची सवय असते.
  9.  या राशीच्या मुली तीक्ष्ण दृष्टी असलेल्या असतात. या जास्त सुंदर नसल्या तरी आकर्षक असतात.
  10.  हे लोक बुद्धिमान आणि भावूक असतात. यांच्या इच्छाशक्ती दृढ असते. स्त्रिया हट्टी आणि महत्त्वकांक्षी असतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.