Astrology: अत्यंत चमत्कारिक आहे हा रत्न, धारण केल्याने कर्माला मिळते नशिबाची साथ

| Updated on: Oct 01, 2022 | 11:06 PM

बऱ्याचदा एखाद्या कामात कितीही प्रयत्न केलें तरी यश मिळत नाही. यामध्ये काय कारण असू शकते? आणि उपाय काय आहे जाणून घेऊया.

Astrology: अत्यंत चमत्कारिक आहे हा रत्न, धारण केल्याने कर्माला मिळते नशिबाची साथ
गोमेद रत्न
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  बऱ्याचदा अथक प्रयत्नानंतर देखील कामात यश मिळत नाही. जोतिषशास्त्राच्या (Astrology) मते नकारात्मक ऊर्जा यामध्ये बाधा बनते अशावेळी रत्नशास्त्रामध्ये (Gemology) रत्नांबद्दल काही रत्नाचे उपाय सांगितले गेले आहे. विशिष्ट रत्नाच्या धारण केल्याने नकारात्मक ऊर्जा (Negative energy) दूर होते. मात्र, यासाठी रत्नाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र कुठलेही रत्ना हे जाणकारांच्या सल्ल्यानेच धारण करावे. आज आपण अशाच एका रत्नाबद्दल जाणून घेणार आहोत. त्याचे नाव गोमेद (Gomed Stone) आहे. हे अतिशय चमत्कारिक रत्न मानले जाते. हे धारण केल्याने  खूप फायदा होतो.  रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतात आणि इच्छित कार्यात त्यांना यश प्राप्त होते.

आजारांवरही होतो फायदा

गोमेद हे राहू ग्रहाचे रत्न मानले जाते. हे रत्न लाल आणि तपकिरी रंगाचे असून अतिशय चमकदार आहे. जर एखाद्याच्या कुंडलीत राहु प्रतिकूल स्थितीत असेल तर ज्योतिषी त्यांना गोमेद घालण्याचा सल्ला देतात. गोमेद धारण केल्याने ब्लड कॅन्सर, डोळे आणि सांधेदुखी यांसारख्या आजारांमध्ये लाभ मिळतो.

या राशीचे लोक परिधान करू शकतात

ज्योतिषशास्त्रानुसार प्रवाळ आणि पुष्कराज धारण करणाऱ्यांनी कधीही गोमेद धारण करू नये. अन्यथा फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. गोमेद रत्न मिथुन, वृषभ, कन्या, तूळ आणि कुंभ राशीचे लोक परिधान करू शकतात. हे नेहमी चांदीच्या अंगठीत घालावे.

हे सुद्धा वाचा

या लोकांनी घालू नये

ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांना राजकारणात करियर बनवायचे आहे, त्यांना याचा खूप फायदा होतो.  ज्यांच्या पत्रिकेत राहू 5व्या, 8व्या, 9व्या, 11व्या आणि 12व्या स्थानात बसला आहे, अशा लोकांनी गोमेद घालणे टाळावे. अन्यथा याचा उलट परिणाम होऊ शकतो.