Astrology: आजचे राशी भविष्य, ‘या’ राशीच्या लोकांची महत्त्वाची कामं मार्गी लागतील

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाणार आहे? या राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन मार्ग गावसतील.

Astrology: आजचे राशी भविष्य, 'या' राशीच्या लोकांची महत्त्वाची कामं मार्गी लागतील
राशी भविष्य
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 8:40 AM

मुंबई,  ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल.  मन प्रसन्न राहील. बर्‍याच दिवसानंतर तुम्हाला कुणाला तरी भेटण्याची संधी मिळेल. नवीन काम सुरू करणे फायद्याचे ठरेल. कोर्टाच्या खटल्यांमधून सुटका होऊ शकते. दिवस चांगल्या बातमीने प्रारंभ होणार आहे.
  2. वृषभ- नवीन काम सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे. दिवस अतिशय खास बनविण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल, मन प्रसन्न होईल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. काही नवीन काम सापडेल.
  3. हे सुद्धा वाचा
  4. मिथुन- तुमचा दिवस चांगला सुरू होणार आहे. तुम्हाला व्यवसायात देखील फायदा होणार आहे. याशिवाय नोकरीत पदोन्नती मिळेल. उधार दिलेले पैसे परत मिळतील. मित्र किंवा कुटुंबियांसह प्रवासाचा योग आहे.
  5. कर्क- विध्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे. परिश्रमानुसार यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची योजना यशस्वी होईल. दिवसाची सुरुवात आत्मविश्वासाने होईल. कुटुंबाचं प्रेम आणि सहकार्य मिळेल.
  6. सिंह- तुमचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात फायदा होईल. नोकरीची परिस्थिती देखील चांगली राहील. तुम्हाला हवं तसं कामाचं फळ तुम्हाला मिळेल. कार्यक्षेत्रात आज पैशाची प्राप्ती होईल. मित्र, कुटुंबातील सदस्य आणि सहकारी तुम्हाला मदत करतील.
  7. कन्या- आज आरोग्याची काळजी घ्या. धावपळ करु नका. दिवस आनंदाचे आहेत. आयुष्यात आनंदाची बरसात होणार आहे. धनलाभ होण्याची संधी आहे.
  8. तूळ- हुशारीचा वापर करून काम केलं तर त्यात तुम्हाला नक्की यश मिळेल. मोठे व्यवहार टाळा. आज शक्यतो आराम करा. अधिकचा ताण घेऊ नका. गोष्टी मनाजोग्या होतील फक्त थोडा वेळ द्या.
  9. वृश्चिक- नव्या विचारानं पुढे जा. कामाच्या बाबतीत काही नवे व्यवहार कराल. भावनांवर नियंत्रण ठेवा. तुमच्या भावनांचा गैरफायदा कोणालाही घेऊन देऊ नका.
  10. धनु- शनिवार तुमच्यासाठी चांगला दिवस असेल. कामात यश मिळवून लाभ होईल. तुम्ही स्तुतीस पात्र ठराल. भाग्य तुमच्या सोबत असणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल.
  11. मकर- आज तुमच्या नेतृत्त्वंक्षमतेची परीक्षा आहे. महत्त्वाची कामं मार्गी लागतील. अडकलेले पैसे परत मिळतील. कोणालाही कमी लेखू नका. प्रत्येकाचे आभार माना.
  12. कुंभ- तुमचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. मंगल कार्यात तुम्ही भाग घ्याल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक केलं जाईल. शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून सर्व शक्य सहकार्य मिळेल.
  13. मीन- कुटुंबाकडून आज सुख मिळेल. मंगल कार्य किंवा समारंभात सामील व्हाल. एखाद्या विशेष व्यक्तीशी भेटणं आठवणीत राहील. कामासाठी दिवस चांगला आहे, नवीन उत्साह मनामध्ये दिसेल. प्रेम संबंधात यश मिळेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.