
Baba Vanga Predictions : आता 2026 या नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. अनेकांनी हे वर्ष चांगले जावे, अशी प्रार्थना केली आहे. सोबतच प्रगतीच्या वाटेने जाण्यासाठी अनेकांनी काही संकल्पदेखील केले आहेत. परंतु आता या नव्या वर्षात बऱ्याच मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कारण बल्गेरियामधील भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांची 2026 सालासाठीची भविष्यवाणी सध्या चर्चेत आली आहे. त्यांनी या वर्षी जगावर अनेक संकटं येणार असल्याचे भाकित केले आहे. यामध्ये आर्थिक मंदी, एआयचे संकट यांचाही उल्लेख आहे. त्यामुळे बाबा वेंगाने नेमकी कोणती भविष्यवाणी करून ठेवली आहे? या नव्या वर्षात नेमकं कोणत संकट येणार? हे जाणून घेऊ या…
बाबा वेंगा यांनी 2026 सालच्या आर्थिक व्यवस्थेबाबत भविष्यवाणी करून ठेवली आहे. या भविष्यवाणीनुसार 2026 साली जगात आर्थिक मंदी येऊ शकते. तसेच जगाला आर्थिक संकटाचाही सामना करावा लागू शकतो. या आर्थिक मंदीमुळे ज्या देशांची अर्थव्यवस्था नाजूक आहे, त्या देशांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
बाबा वेंगाने 2026 सालात एआयचा धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगितले आहे. सोबतच 2026 साली एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या एआयच्या ताकदीला माणूस नियंत्रित करू शणार नाही. मशिनींचा प्रभाव वाढेल. त्याची माणसाला अडचण निर्माण होऊ शकते, असे भाकित बाबा वेंगाने करून ठेवले आहे.
सोबतच बाबा वेंगाने या वर्षी अनेक नैसर्गिक संकटं येणार असल्याचंही भाकित केलं आहे. यामध्ये ज्वालामुखी, ढगफुटी, भूकंप, जलवायू परविर्तन अशा अनेक संकटांचा उल्लेक आहे. या संकटामुळे पृथ्वीवरची साधारण सात ते आठ टक्के जमीन प्रभावित होऊ शकते, असे भाकित बाबा वेंगाने केले आहे.
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.