
बाबा वेंगा या एक जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्या होत्या, त्यांचा जन्म 1911 साली बल्गेरियामध्ये झाला तर मृत्यू 1996 मध्ये झाला. त्यांच्या समर्थकांकडून असा दावा करण्यात येतो की, बाबा वेंगा यांनी आपल्या हयातीमध्ये जी काही भाकीतं केली होती, ती कालांतराने खरी ठरली, बाबा वेंगा यांच्या बाबत असा देखील दावा करण्यात येतो की, लहानपणी एका वादळात सापडल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावली, मात्र त्यानंतर त्यांना दिव्य दृष्टीची प्राप्ती झाली आणि त्यांनी वर्तवलेली भाकीतं खरी ठरू लागली. मात्र याला कोणताही वैज्ञानिक आधार नाहीये.
बाबा वेंगा यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक भाकीतं केले, ज्यामध्ये त्यांनी हिटलरच्या मृत्यूबाबत भाकीत केलं होतं, ते खरं ठरल्याचा दावा केला जातो. इंग्लंडच्या राणीचा मृत्यू, जपानमध्ये आलेली त्सुनामी, अमेरिकेवर झालेला हल्ला याबाबत त्यांनी आधीच सांगितल्याचं म्हटलं जातं, ही सर्व भाकीत खरी ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान बाबा वेंगा यांनी 2025 बाबात देखील थरकाप उडवणारी भविष्यवाणी केली आहे. 2025 साली जगाच्या अंताला सुरुवात होईल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. 2025 साली जगातील अनेक देशांमध्ये प्रचंड शक्तिशाली भूकंप येतील, यामुळे मोठी वित्तहानी आणि जीवितहानी होईल. युद्ध होतील ज्याचा सर्वाधिक फटका हा पश्चिमेकडील देशांना बसेल. काही देशांमध्ये महापूर येईल, असं भाकीत 2025 बाबात बाबा वेंगा यांनी वर्तवलेलं आहे. दरम्यान आतापर्यंत काही देशांना भूकंपाचे हादरले बसले आहेत, त्यामुळे हेही बाबा वेंगा यांचं भाकीत खरं ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.
दरम्यान आता 2025 बाबत बाबा वेंगा यांनी केलेलं आणखी एक भाकीत समोर आलं आहे, ज्यामुळे चिंता वाढली आहे. बाबा वेंगा यांचं हे भाकीत आर्थिक संकटाशी संबंधित आहे. 2025 मध्ये जगावर मोठं आर्थिक संकट येईल, असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. जागतिक बाजार अस्थिर होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान सध्या दोन बलाढ्य देश असलेले अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वार सुरू आहे, या पार्श्वभूमीवर हे भाकीत आहे का? असा प्रश्न बाबा वेगां यांच्या समर्थकांना पडला आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)